Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्लीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात 

नाशिक प्रतिनिधी - दिल्लीत बी.डी. मार्गावर नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात सुदैव

विजयादशमीनिमित्त झेंडूची फुले ऐंशी ते शंभर रुपये किलो (Video)
आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स
एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने महिलेचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – दिल्लीत बी.डी. मार्गावर नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात सुदैवाने हेमंत गोडसे हे बचावले आहेत. मात्र कारचे मोठे नुकसान झाले. संसदेमध्ये छत्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते दिल्लीत आले होते. आज कार्यक्रम संपल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला. एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरुन येणा-या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. यामध्ये गोडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण, गाडीचे बरेच नुकसान झाले.

COMMENTS