Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या साहित्य प्रतिभेला पुरस्कार  

नाशिक - नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील एक उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी... कोणत्याही प्रकारची घमेंड न ठेवता सर्वस

खते, बी-बियाणांमध्ये शेतकर्‍यांची लूट
कोयते, चाकू घेऊन दहशत करणारे सराईत गुन्हेगारांना अटक
मुलीला पळवले, पुन्हा घरी सोडले व पुन्हा पळवले…

नाशिक – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील एक उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी… कोणत्याही प्रकारची घमेंड न ठेवता सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेला, सर्वसामान्या मधील असामान्य व्यक्तिमत्व…! गुन्हेगारांचा कर्दनकाळ, गोरगरिबांचा तारणहार, कामाचं सतत ध्यास असलेले ह्या ‘आगळ्यावेगळ्या पोलीस व्यक्तिमत्वाने खात्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठसा तर उमटवलाच परंतु त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. वरिष्ठ पदावर असूनही त्यांचे पाय असतात.

देशपातळीवरील स्पर्धेत सहा वेळा भाग घेऊन लॉन टेनिस खेळामध्ये नैपुण्य मिळवलेल्या या सर्वगुण संपन्न पोलीस अधिकाऱ्याने साडेपाच वर्ष सातत्य व जिद्द ठेवून सुमारे आठ हजार किलोमीटर प्रवास करून जिथे जिथे मुघलांच्या विरुद्ध लढाया झाल्या तेथे प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचे आकलन करून लिहिलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे सरसेनापती संताजी शंभूराजांच्या क्रूर हत्येचा प्रतिशोध यांच्या सुलभ लेखणीतून आणि साडेपाच वर्षाच्या मेहनतीतून साकारलेले शूर सरसेनापती संताजी हे पुस्तक रसिकांची तर दाद देऊन जातेच परंतु ब्रिटिश कालीन इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद यांच्याकडून शूर सरसेनापती संताजी या सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक साहित्यकृतीस 2022या वर्षातील रा. ना. नातू पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

उत्कृष्ट साहित्य निर्मितीच्या कसोटीस उतरलेल्या ह्या ऐतिहासिक ग्रंथास नुकतेच सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक लेखनाचे पारितोषिक नुकतेच पुणे येथे निवड मंडळाने जाहीर केले आहे. अत्यंत सरळ सोपी भाषा व कलात्मक मांडणी, रसिक वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडनारी ऐतिहासिक काळातील शब्दरचना आणि डोळ्यासमोर उभे राहणारे प्रसंग, जणू वाचकाला इतिहासामध्ये घेऊन जातात.

असंख्य ऐतिहासिक संदर्भांचे आकलन भौगोलिक मापदंडातून केलेले ऐतिहासिक संशोधन, हुबेहूब प्रसंग उभे करण्याचे कौशल्य जणू आपण त्या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत असा भास निर्माण करण्याची हातोटी, निसर्गाचे केलेलं सुंदर वर्णन प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला दिलेला न्याय, समतोल लेखनातील प्रभुत्व, मराठी भाषेची सुरेख मांडणी, उत्कृष्ट मुखपृष्ठरचना व प्रसंग जिवंत करणारी रेखाचित्रे हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. पोलीस खात्यातील अत्यंत व्यस्त जीवनातून असं काही कोणी लिहिलं याची कल्पना सुद्धा अंगावर शहारे आणते.

पुस्तक वाचताना अंगात वीररस संचारतो, पुस्तक पूर्ण केल्याशिवाय खाली ठेऊशी वाटत नाही. शेखर साहेबाना मानावे लागेल, जिगर ठेवून ध्यास घेऊन अशा प्रकारची पुस्तक निर्मिती करणे खरोखर खडतर लढाई जिंकल्या सारखे आहे, मराठी साहित्य क्षेत्रातील अग्रेसर अशा संस्थेकडून अशा उत्कृष्ट साहित्य निर्मितीस पुरस्कार मिळणारे सामान्य माणसासारखे राहणारे, वागणारे पोलीस दलातील असामान्य व्यक्तिमत्व कधीही पदाचा गर्व नाही, घमेंड नाही आपल्या मनमिळाऊ स्वभावाने असंख्य चाहते निर्माण करणारे डॉक्टर बीजी शेखरपाटील यांचे व्यक्तिमत्व पोलीस दलामध्ये स्वतःच्या कर्तुत्वाने आदर्श निर्माण करणाऱ्या, राष्ट्रपती पदक व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून युनो मेडल ने गौरविण्यात आलेले डॉक्टर बीज शेखर पाटील साहेबांच्या साहित्य निर्मितीत वैविध्य आणि सातत्य आहे.

COMMENTS