Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक कृषी व नव तेजस्विनी महोत्सव- 2024

विविध विषयांवर परिसंवाद संपन्न

नाशिक - महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने श

उदयनिधी स्टॅलिनच्या अडचणी वाढल्या
राज्य महिला आयोगाच्या उर्वरित सदस्यांची नेमणूक करू – रूपाली चाकणकर (Video)
शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांची आज बैठक

नाशिक – महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डोंगरे वसतिगृह मैदान येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक कृषी व नव तेजस्विनी महोत्सव -2024 चे आयोजन करण्यात आले होते. 14 फेब्रुवारी 2024 रोजी विविध विषयांवर आयोजित परिसंवाद कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. असे  प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा  राजेंद्र निकम यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

आयोजित परिसंवाद कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे, कृषि उपसंचालक  जगदिश पाटील, स्मार्टचे नोडल अधिकारी  जितेंद्र शहा,  मुल्यसाखळी तज्ञ स्मार्ट, वरूण पाटील, कार्यक्रम समन्वयक युवराज उखाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

परिसंवाद कार्यक्रमात  महिला शेतकरी गट/ कंपनी यांच्यासाठी कृषि क्षेत्रातील संधी या विषयावर कळसुबाई शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक निलिमा जोरवर यांनी मार्गदर्शन केले. महिलांसाठी विविध शासकीय योजना या विषयावर कार्यक्रम अधिकारी युवराज उखाडे यांनी तर मशरूम उत्पादन व प्रक्रीया  या विषयावर  कृषि उद्योजक चेतना पवार यांनी मार्गदर्शन केले. भरड धान्याचे आहारातील महत्व या विषयावर आहारतज्ञ डॉ.हिमानी पुरी यांनी मार्गदर्शन करीत उपस्थित महिलांच्या शंकाचे निरसन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी यावेळी शेतकऱ्यांचे व महिला बचत गटांच्या विविध स्टॉल्सला भेट दिली व महिलांशी संवाद साधला. महोत्सव आयोजनाबाबत त्यांनी समाधानव्यक्त करीत  महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाच्या विक्रीसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे मतही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी मांडले.

COMMENTS