शरद पवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यावरून, महाराष्ट्रात राजकी

शरद पवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यावरून, महाराष्ट्रात राजकीय वादंग उभे राहिले आहे. यामध्ये, शिवसेनेचे संजय राऊत हे सर्वात आक्रमक झाले असून, त्यांनी शरद पवारांना संबोधित करताना आम्हालाही राजकारण कळते, अशा शब्दात टीका केली आहे. अर्थात, एकनाथ शिंदे यांच्या सत्काराची घटना शिवसेनेला झोंबली आहे, हे त्यातून निश्चितपणे स्पष्ट होतं. शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या राजकारणापेक्षा वेगळं काही केलं असंही आपल्याला म्हणता येत नाही. कारण, शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट सांगतात त्याच्या विपरीत ते प्रत्यक्षपणे कृती करत असतात. हे महाराष्ट्राच्या जनतेने अनेक वेळा अनुभवले आहे. त्यामुळे, शरद पवार हे स्वतःच्या बळावर महाराष्ट्रामध्ये राजकीय सत्ता स्थापन करू शकले नाहीत. मोडतोडीच्या राजकारणाशिवाय त्यांना राजकीय सत्ता कधीही प्राप्त झाली नाही. सुरुवातीला ते जेव्हा पुलोद च्या माध्यमातून मुख्यमंत्री बनले; त्याहीवेळी त्यांनी पक्ष सोडून अन्य पक्षांना एकत्रित करत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळवले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकारणाची सूत्र ही, ‘सांगणं एक आणि करणं वेगळं’, अशाच थाटाची राहिली आहेत. संजय राऊत यांना हेच महाराष्ट्राच्या राजकारणात अजून पावेतो कळलेले नाही की, त्यांनी शरद पवार यांच राजकारण खऱ्या अर्थानं समजूनच घेतलं नाही. राष्ट्रीय राजकारणात देखील शरद पवार हे एका बाजूला पुरोगामी राजकारण करण्याच्या भूमिकेतून इंडिया आघाडी सोबत येतात; परंतु, इंडिया आघाडीचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेला काँग्रेस हा सातत्याने सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही देशातील दोन भांडवलदारांवर सातत्याने टीका करीत असताना, शरद पवार मात्र, त्याच भांडवलदारांसोबत जुळवून घेतात, ही घटना जेव्हा घडते तेव्हा अशा प्रकारची टीका संजय राऊत हे करू शकलेले नाहीत. कारण राजकारणात सगळेच पक्ष भांडवलदारांच्या संपत्तीच्या किंवा दानाच्या ओझ्याखाली दबलेले असतात. मुंबईचा प्रश्न जेव्हा निघाला तेव्हा शिवसेनेने विरोध केला असला तरी, प्रत्यक्षात जेव्हा दोन्ही भांडवलदारांपैकी एका भांडवलदाराच्या मुलाच्या लग्नात, देशातील राजकीय नेते हजर राहिले किंवा उपस्थित राहिले, त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे देखील मागे राहिले नाहीत. त्यांच्या घटकातील सर्वात मोठा पक्ष भांडवलदारांचा प्रश्न सभागृहात किंवा संसदेत उपस्थित करून आपली खासदारकी धोक्यात आणतो, अशा वेळी हे घटक दलाचे नेते मात्र त्याच भांडवलदारांच्या लग्नामध्ये उपस्थित राहून, इंडिया आघाडीच्या भूमिकेशी विसंगत भूमिका निभवतात. तेव्हा, मात्र त्यांना राजकारण कळत नाही, यांची जाणीव आपण करून द्यावी. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय शिष्य असल्यामुळे, अगदी त्यांच्यासारखंच राजकारण ते त्यांच्या जीवनभरात करत राहिलेले आहेत. यशवंतराव चव्हाण हे साहित्याच्या मंचावर आणि साहित्यिकांच्या मागे जसे उभे राहात, तीच पद्धत शरद पवार यांनी आपल्या राजकीय जीवनात देखील अंगिकारली आहे. मुळातच मराठी साहित्य संमेलन दिल्लीला जेव्हा होते, तेव्हा, त्याच्यामागे काहीतरी राजकारण असावं, असा संशय मुळातच लोकांच्या मनात होता. जेव्हा साहित्याच्या मंचावर केवळ राजकीय नेतृत्वाची चर्चा होते, तेव्हा, साहित्यिकांनी त्यांच्या नीतिमत्तेविषयी जनतेने किंवा वाचकांनी नेमका काय संदेश घ्यावा, हे एकदा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडायला हवं. अशी महाराष्ट्राच्या भाबडी जनतेला अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून साहित्याच्या मंचावर शरद पवार ज्येष्ठ नेते म्हणून जेव्हा स्वागत करतात, तेव्हा, त्या माणसाचा आणि या नेत्यांचा तसा साहित्यिक संबंध कोणताही दिसून येत नाही. परंतु, वस्तुस्थिती मात्र प्रत्यक्षात घडली ती नाकारताही येत नाही. अशा परिस्थितीत साहित्यिकांच्या मेळामध्ये केवळ राजकीय नेते गर्दी करत असतील, तर, त्या मागचं गमक काय हे महाराष्ट्राच्या वाचक जनतेसमोर निश्चितपणे यावं.
COMMENTS