Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेंद्राचार्य महाराजांनी भक्तीचा सन्मार्ग दाखविला ः पुष्पाताई काळे

गुढीपाडवानिमित्त कोपरगावमध्ये भव्य शोभायात्रा उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी : अध्यात्मिक जगतात जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांना प्रभावशाली व्यक्ती म्हणून देशभर त्यांची ओळख आहे. जगण्यासाठी आवश्यक असणारा स

’रेसिडेन्शियल’ विद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
सुरेगाव शिवारात नऊ एकर ऊस जळून खाक
सतराशे किलोचे गोमांस पोलिसांनी केले जप्त

कोपरगाव प्रतिनिधी : अध्यात्मिक जगतात जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांना प्रभावशाली व्यक्ती म्हणून देशभर त्यांची ओळख आहे. जगण्यासाठी आवश्यक असणारा सन्मार्ग दाखवतांना जीवन जगत असतांना संसार सांभाळून भगवंताचे नामस्मरण महत्वाचे आहे. हे श्री क्षेत्र नानीजधामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांनी आपल्या प्रवचनातून भक्तांना पटवून देत राज्यभरातील असंख्य भक्तांना भक्तीचा सन्मार्ग दाखविला असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी केले.
सालाबाद प्रमाणे दरवर्षी श्री क्षेत्र नानीजधामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या भक्तांकडून जिल्ह्यात गुढीपाडव्याला नवीन वर्षानिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात येते. यावर्षी हि शोभायात्रा कोपरगाव येथे काढण्यात आली व साईबाबा तपोभूमी येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रमुख यजमान म्हणून पुष्पाताई काळे या उपस्थित होत्या तर डॉ. मेघना देशमुख या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पुष्पाताई काळे बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. मेघना देशमुख यांनी देखील श्री क्षेत्र नानीजधामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या धार्मिक कार्याचा उल्लेख करून त्यांनी देशभरातील असंख्य भक्तांना खर्‍या समाधानाचा व आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला आहे. गुढीपाडव्याला नवीन वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेत सहभागी होवून जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यंकटेश बाप्पा, सोमेश्‍वर घोगरे, जगन बोठे, सयाजी भडांगे, गोकुळ वैष्णव, राजेंद्र घोटकुळे, सुरेश चंदनशिव, पगारे, स्वप्निल गायकवाड, राजेंद्र चेचरे, संदीप दीक्षित, अलका खर्डे, सोनाली जाधव, नगरसेविका माधवी वाघचौरे, अशोक मुसमाडे आदींसह भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS