Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या

टाकरवन वार्ताहर - माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे दिनांक 12 मे शुक्रवार रोजी येथील नारायण भगवान उंडे रा टाकरवन वय 40 वर्ष यांनी शेतातील आंब्याच्य

डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या
सहायक पोलिस आयुक्ताची पत्नी आणि पुतण्यासह आत्महत्या
टाकरवण येथील नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या

टाकरवन वार्ताहर – माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे दिनांक 12 मे शुक्रवार रोजी येथील नारायण भगवान उंडे रा टाकरवन वय 40 वर्ष यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला दुपारच्या वेळेस गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी खिशात सापडल्याने खळबळ माजली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण उंडे यांच्या पत्नी शिवकन्या उंडे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीसात फिर्याद दाखल केली आहे की, माझे पती व मी सोनारपाडा डोंबिवली ईस्ट ठाणे येथे राहत आहोत .माझे पती नारायण उंडे हे चूर टेक्स्टाईल सरवली एमआयडीसी गोवेगाव भिवंडी जि. ठाणे या कंपनीत लँब मध्ये काम करत होते. त्याच लॅब मध्ये दत्ता बाबासाहेब पाथरकर रा. टाकरवन  हा चुर कंपनीमध्ये लॅब इनचार्ज म्हणून कामाला आहे नारायण हे त्याच्या हाताखाली होते पाथरकर यानी तुला जर कंपनीमध्ये
माझ्या हाताखाली काम करायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील,तसेच याच कंपनीमध्ये पाथरकर याचे एका महिलेशी प्रेम संबंध आहेत त्या महिलेस तू गाडीवर ने आन करत जा असे म्हणत होता व सतत पैशाची मागणी करत मानसिक त्रास देत होता.असे नारायण घरी सांगत असे याची मागणी पूर्ण न केल्याने नारायण ला एक महिन्यापूर्वी याने कंपनी मधून काढून टाकले होते . नंतर नारायणने दुसरीकडे काम पाहिले तिथेही त्यांना काम करून दिले नाही असे नारायण यांनी आत्महत्या करण्यापुर्वी खिशात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत व घरी सुद्धा डायरी मध्ये लिहून ठेवले.मी माझे जीवन संपत आहे असे लिहून ठेवून व सही करून आत्महत्या केली .नारायण व त्यांचे कुटुंबीय नुकतेच कार्यक्रमानिमीत्त गावाकडे आले होते .नारायण हा गावातील शांत स्वभावाचा मुलगा होता तो आई-वडिलांना एकुलता एक होता त्याच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी ,मुलगा वय10 ,व मुलगी वय 13 असा परिवार आहे. या प्रकरणी दत्ता पाथरकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 306 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास माजलगाव ग्रामीणचे पोलीस अधिकारी रणजीत कासले हे करत आहेत.

COMMENTS