Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या नंदिनी राजपूत-गावंडे यांनी पटकावला मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्डचा मुकुट

आता कॅनडातील स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

रियामा फाऊंडेशनच्या वतीने इंदोर शहरात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिस आणि मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेतील

महाराणी छत्रपती ताराबाईंचा इतिहास येणार रुपेरी पडद्यावर
शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना ईडीचा दणका
सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 60 एकर ऊस जळून खाक

रियामा फाऊंडेशनच्या वतीने इंदोर शहरात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मिस आणि मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेतील मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ मुकुट नाशिकच्या नंदिनी राजपूत – गावंडे यांनी पटकावला आहे. आता त्या कॅनाडा मध्ये होणाऱ्या कॉसमॉस वर्ल्ड वाइड ब्युटी या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

नाशिकमध्ये बँक मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या नंदिनी राजपूत – गावंडे यांनी मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड २०२४ चा ताज पटकावल्याने नाशिकचे नाव मॉडेलिंगच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. इंदोर शहरातील हॉटेल ग्रँड शेरेटनमध्ये गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री ही स्पर्धा परीक्षक अभिनेत्री जया प्रदा, आदिती गोवित्रिकर आणि इंडियन आयडॉल फेम आद्या मिश्रा यांच्या उपस्थितीत पार पडली. सौंदर्यासोबतच व्यक्तीमत्वाचे कौशल्य, बुद्धिमत्ता आणि स्थानिक संस्कृतीची जाणीव अशा विविध क्षमतांचा कस पाहणाऱ्या या सौंदर्य स्पर्धेत १८ ते ५५ या वयोगटातील जगभरातील ३० सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. प्रिया शुक्ला आणि निरुपमा शर्मा यांनी दिग्दर्शन केलेल्या या स्पर्धेत स्वपरीचय, बुद्धिमत्ता, पोजिंग स्किल्स, कॅटवॉक, ट्रॅडिशनल अँड नॅशनल कॉस्च्युम राऊंड अशा विविध फेऱ्यातून या स्पर्धकांना आपल्या सौंदर्यासोबतच अंगभूत कौशल्यांचे सादरीकरण करावे लागले. बासरीच्या धून वरील रॅम्प वॉक हे या सौंदर्य स्पर्धेचे खास वैशिष्ट्य ठरले. स्पर्धकांनी वेस्टर्न आऊटफिट ते पारंपारिक वेशभूषेतील केलेले सादरीकरण डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. तिन्ही परीक्षकांनी या स्पर्धेचा मुकुट नंदिनी राजपूत – गावंडे यांच्या डोक्यावर चढवला. 

 भारतमातेचे रूप सादर करून विविधतेतील एकतेचे घडविले दर्शन – या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला एका फेरीत कोणत्याही एका देवीचे रुप सादर करावयाचे होते. नंदिनी राजपूत – गावंडे यांनी बासरी आणि सुफी बँड या लाईव्ह बँडच्या सुरांत पारंपारिक वेशभूषेत भारतमातेचे रूप सादर केले. पाठीमागे भारताची विविधतेतील एकतेचा संदेश देणारे सर्व धर्मियांच्या प्रार्थना स्थळांचे प्रतीके या स्पर्धेचे वेगळेपण ठरले. नंदिनी राजपूत – गावंडे यांनी विविधतेतील एकतेचे दर्शन घडवून परीक्षांना या स्पर्धेचा ताज बहाल करण्यास भाग पाडले. 

१६ महिन्यांच्या कष्टाचे चीज झाले – या सौंदर्य स्पर्धेची माहिती मिळाल्यावर नंदिनी राजपूत – गावंडे यांनी नाव नोंदणी केली. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून तब्बल १६ महिने कसून तयारी केली. वजन कमी करण्याचे लक्ष्य देखील साध्य केले. पती डॉ. अनुप गावंडे, दिर अनिकेत गावंडे, सासू, सासरे, आई यांच्या खंबीर आणि सकारात्मक पाठींब्यासह डॉ. प्रिया आहेर, डॉ. काश्मी, राणी यांचे मार्गदर्शन, मैत्रिणी हेमल ठक्कर, आरती सेठ यांचे सहकार्य उपयुक्त ठरले. मुंबई, पुणे येथे कॉस्च्युम निवडला परंतु अंतिम निवड मात्र इंदोर शहरातच केली. 

” लहानपणा पासूनच मॉडेलिंगची आवड होती. मात्र स्पर्धेत भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेचे आव्हान पेलणे अर्थात सोपे नव्हतेच. नोकरी करून आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून या स्पर्धेची तयारी केली. पती डॉ. अनुप गावंडे, दिर अनिकेत गावंडे यांचे सहकार्य, लहान जुळी मुले रावी आणि ऋषी यांचा त्याग, कुटुंबीयांचा आणि  मैत्रिणींचा पाठींबा खूप महत्वाचा ठरला. देशाचे प्रतिनिधित्व आता पुढील स्पर्धेत करायला मिळणार असल्याचा गर्व वाटतो.”- नंदिनी राजपूत – गावंडे*

COMMENTS