Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज, रोजगार आणि पर्यावरण : नांदेडच्या विकासाचा त्रिसूत्री अजेंडा-ना.पंकजाताई मुंडे

घनकचर्‍यापासून वीज, नांदेडसाठी हरित विकासाचा आराखडानांदेड । प्रतिनिधीघनकचर्‍यापासून वीजनिर्मितीचा आधुनिक प्रकल्प नांदेडमध्ये उभारून शहराला विजेच्य

दर्पण दिना निमित्त कुंडलवाडी पोलीस स्टेशन वतीने पत्रकार बांधवांना हेतूचित सन्मान करण्यात आले
मनपा निवडणुकीत काँग्रेस-वंचितला मतदानाचे आवाहन -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
Nanded : जिल्हापरिषद शाळेमध्ये चालतो मटका व दारूचा व्यवसाय (Video)

घनकचर्‍यापासून वीज, नांदेडसाठी हरित विकासाचा आराखडा
नांदेड । प्रतिनिधी
घनकचर्‍यापासून वीजनिर्मितीचा आधुनिक प्रकल्प नांदेडमध्ये उभारून शहराला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. पर्यावरणपूरक विकास हाच नांदेडच्या भविष्यातील मार्ग आहे, असे ठोस प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा अंतर्गत दिपनगर परिसरात आयोजित कॉर्नर बैठकीत त्या बोलत होत्या.
केंद्र, राज्य आणि महानगरपालिका अशी ट्रिपल इंजिन सरकारची संधी नांदेडला मिळणार असल्याचे सांगत पंकजाताई मुंडे म्हणाल्या, नांदेडला केवळ प्रशासकीय किंवा शैक्षणिक शहर न ठेवता औद्योगिक, रोजगारनिर्मितीचे आणि पर्यावरणपूरक मॉडेल शहर बनवायचे आहे. यासाठी मी स्वतः, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि खा. डॉ. अजित गोपछडे एकत्रितपणे काम करत आहोत. आता नांदेडच्या विकासासाठी राजकारण नव्हे, तर ठोस नियोजन आणि निर्णय होतील. भाजपाची वैचारिक पार्श्वभूमी अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी मराठवाड्यात सामान्य घरातील मुलांना एकत्र करून जी चळवळ उभी केली, त्यातून भाजपाचा विस्तार झाला. राष्ट्र प्रथम मानणारे संस्कार आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची गरिमा जागतिक स्तरावर वाढवली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. शहरी व ग्रामीण भागातील विकास योजनांचा उल्लेख करत त्यांनी शौचालय योजना, नळयोजना, किसान सन्मान योजना, ग्रामसडक योजना आणि वंदे भारत रेल्वे यांचा उल्लेख केला. आता पुढची पिढी कमळमय करायची आहे, असा स्पष्ट राजकीय संदेश त्यांनी दिला. यावेळी आ.श्रीजयाताई चव्हाण यांनी सांगितले की, विरोधक केवळ टीका करतात, मात्र नांदेडच्या विकासासाठी नियोजन, निधी आणि योजना आणण्याची दूरदृष्टी भाजपाच्या नेतृत्वाकडे आहे. डबल इंजिन सरकारला महापालिकेतील भाजपाच्या विजयाचा तिसरा डबा जोडून भाजपाला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. खा.डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक सहा हा भाजप व संघाच्या स्वयंसेवकांनी उभारलेल्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. समृद्धी मार्ग, भूमिगत गटार योजना, अंडरग्राउंड लाईट योजना आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने भूमिगत गटार योजनेस मान्यता दिली आहे. या बैठकीस प्रतापराव पावडे, भाजपाचे अधिकृत उमेदवार वैशाली देशमुख, आशिष नेरलकर, राजेश यन्नम, शीला भवरे, बंडू पावडे ,नामदेव केंद्रे, सूर्यकांत गुट्टे, मिलिंद देशमुख, किशोर भवरे, प्रवीण कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची मोठी उपस्थिती पाहून पंकजाताई मुंडे यांनी महिलांशी संवाद साधण्यासाठी धार्मिक पूजांचे व्हिडिओ व रिल्स वापरत असल्याचे सांगितले. पक्षादेश शिरसावंद्य आहे. पक्षाच्या आदेशामुळे ज्यांनी उमेदवारी मागे घेतली, त्या सर्व बहिणींचा सन्मान केला जाईल आणि भविष्यात त्यांनाही संधी दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कॉर्नर बैठकीमुळे प्रभाग सहामधील निवडणूक प्रचाराला मोठी चालना मिळाली असून भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कॉर्नर बैठकीचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष नेरलकर यांनी केले. कॉर्नर बैठकीत महिलांची मोठी उपस्थिती पाहून पंकजाताई मुंडे यांनी महिलांशी संवाद साधण्याची आपली वेगळी राजकीय शैली उघड केली. मी धार्मिक पूजांचे व्हिडिओ आणि रिल्स मुद्दाम टाकते. कधी कामामुळे व्हिडिओ टाकला नाही तर महिला मला फोन करून विचारतात – ताई, आज व्हिडिओ का नाही? या माध्यमातून माझा महिलांशी थेट संवाद होतो. एका महिलेने दुसर्‍या महिलेशी संवाद साधावा, विचार मांडावा, हीच खरी महिला सक्षमीकरणाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS