Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड : महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त भव्य कविसंमेलन

नांदेड : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड य

प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची सेवा घडावी : कृषी मंत्री ॲड. कोकाटे
आषाढी पंढरपूर यात्रेसाठी जिल्ह्यातून 125 एसटी बसेस धावणार
धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू
Displaying Program photo.jpg

नांदेड : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. अक्षरोदय साहित्य मंडळ मागील दहा वर्षांपासून परिवर्तनाचे कार्य साहित्याच्या माध्यमातून करत असून समाजजागृती, सत्याची अनुभूती व विकास हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे.

या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक थोरात बंधू यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री विमलताई शेंडेकवयित्री जयाताई सूर्यवंशी उपस्थित होत्या. कवयित्री शेंडे म्हणाल्या, “वामनदादा कर्डक यांनी आपल्या कवितेत अन्यायाविरोधातील प्रखर आवाज, समाजक्रांतीची ज्वाला आणि परिवर्तनाची आस व्यक्त केली. त्यांच्या कवितांतून समतेचा संदेश झळकतो.” कवयित्री सूर्यवंशी यांनी त्यांच्या कवितेतील वास्तव अधोरेखित करताना सांगितले की, “दारिद्र्य, शोषण, भूक आणि संघर्षाचे चित्रण त्यांच्या कवितांतून स्पष्टपणे दिसते.” अध्यक्षीय समारोपात थोरात बंधूंनी भाष्य केले की, “वामनदादा यांनी केवळ कविता लिहिल्या नाहीत, तर त्या ओजस्वी आवाजात श्रोत्यांसमोर सादर करून समाजात विद्रोह चेतविला. त्यांच्या कवितेत विद्रोह असला तरी तो विध्वंसक नव्हता, तर नवसर्जनाकडे नेणारा होता.” या कविसंमेलनात कवी चंद्रकांत चव्हाण, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, सरस्वती गोणाकर, गयाताई कोकरे, गझलकार चहकांत कदम, शिलाताई कोकाटे, अजनांताई भेरजे, सुधाताई कांबळे, प्रभाताई इंगळे, सदानंद सपकाळे आदींनी वामनदादा यांच्यावर कविता सादर केल्या. यावेळी महाकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे मुख्य संयोजक संजय निवडगे, प्रा. प्रल्हाद हिंगोले, डॉ. रंगनाथ नवघडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद सपकाळे यांनी केले तर आभारप्रदर्शन चंद्रकांत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अविष्कार शिंदे, पंकज कांबळे, सुयोग भगत, अजित मुनेश्वर, विनय केरमकोंडा, अतिश आठवले, सदानंद सपकाळे, आशा सपकाळे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS