Homeताज्या बातम्यादेश

व्यावसायिकाला हनीट्रॅप मध्ये अडकवून लुटणारी नमरा कादिर जेरबंद

अहमदाबाद/वृत्तसंस्था ः देशभरात हनीट्रॅप आता नवा राहिलेला नाही. हनीट्रॅप आणि सेक्सट्रॉशनच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होण्याची प्रमाण वाढले आहे. ग

टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन
महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला : अतुल भातखळकर
संजीवनीच्या सहा अभियंत्यांची सॅनी कंपनीत नोकरीसाठी निवड

अहमदाबाद/वृत्तसंस्था ः देशभरात हनीट्रॅप आता नवा राहिलेला नाही. हनीट्रॅप आणि सेक्सट्रॉशनच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होण्याची प्रमाण वाढले आहे. गुजरातमध्ये देखील पतीच्या मदतीने एका व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये फसवून त्याच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी युट्यूबर नमरा कादिरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून 80 लाख रुपये जप्त केले आहेत. तर तिचा पती विराट बेनिवाल याच्या अटकेसाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. पीडित व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नमराला अटक केली.


नमरा कादिर हे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. युट्यूबवर तिचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक युजर्स तिला फॉलो करतात. 24 नोव्हेंबर रोजी एका व्यावसायिकाने गुरुग्राममधील सेक्टर-50 येथील पोलिस ठाण्यात नमराविरुद्ध फसवणुक केल्याची तक्रार दाखल केली. नमराने आपल्याकडून 80 लाख रुपये उकळल्याचे या व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले. यामध्ये तिचा पती विराट बेनिवालचाही समावेश असल्याचे तो म्हणाला. या दोघांनी बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन या व्यावसायिकाकडून पैसे उकळले. व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, ’मी कामानिमित्त सोहना रोडच्या रॅडिसन हॉटेलमध्ये नम्रा कादिर नावाच्या मुलीला भेटलो होतो. ती एक युट्युबर आहे, तिचा व्हिडिओ मी पाहिला होता. यावेळी तिने माझी विराट बेनिवालशीही ओळख करून दिली. तो देखील एक युट्यूबर आहे. यावेळी दोघांनीही माझ्या फर्ममध्ये काम करण्यासाठी होकार दर्शविला आणि दोन लाख आगाऊ रक्कम मागितली. पुढे तो म्हणाला की, ’मी त्याच दिवशी दोन लाख रुपये दिले कारण मी नम्राला काही काळापासून ओळखत होतो. नंतर, जेव्हा मी जाहिरातीचे काम आणले तेव्हा तिने हो म्हटले आणि आणखी 50,000 रुपये मागितले, जे मी तिला दिले. मात्र त्यानंतर तिने माझे काम केले नाही. यावेळी नमरा मला म्हणाली की काम फक्त एक निमित्त आहे, खरंतर मी तिला आवडत असून तिला माझ्याशी लग्न करायचे आहे. यानंतर मला देखील ती आवडू लागली आणि आम्ही एकत्र फिरू लागलो. मात्र विराट नेहमीच तिच्यासोबत असायचा. एके दिवशी आम्ही क्लबमध्ये पार्टी करायला गेलो असताना नमरा आणि विराटने मला जबरदस्ती दारू पाजली. व्यावसायिकाने पुढे सांगितले की, आम्ही तिघांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि झोपलो. सकाळी उठल्यावर नम्राने माझ्याकडे माझे कार्ड मागितले आणि मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच यावेळी बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही दिली. मी घाबरलो मी तिला विनंती केली की आपण चांगले मित्र आहोत. मी काहीच चुकीचे केलेले नाही. त्यानंतर विराट बनीवालने त्याच्याजवळील शस्त्रचा धाक दाखवून मी नमराचा पती आहे आणि तू ऐकले नाहीस तर तुला अडकवू अशी धमकी दिली. या घटनेनंतर मी ती बोलल्याप्रमाणे पैसे देऊ लागलो, तिने माझ्याकडून आत्तापर्यंत एकूण 70 ते 80 लाखांचा ऐवज आणि रोख रक्कम घेतली असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पीडित व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, ’नमराने माझा फोन घेतला आणि सर्व पुरावे हटवले आणि फोन रीसेट केला. जेव्हा माझे पैसे संपले, तेव्हा मी त्यांना सांगितले की मला आता सोडा, परंतु तरीही त्यांनी मला धमकावले, म्हणून मी माझ्या वडिलांच्या खात्यातून 5 लाख रुपये काढले. मग माझ्या वडिलांनी मला माझ्या पैशांबद्दल विचारले, त्यावेळी मी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. मग त्यांनी माझे खाते तपासले, अखेर मी त्यांना सत्य सांगितले. यावेळी माझ्या वडिलांनी मला हनी ट्रॅपमध्ये अडकवणार्‍या लोकांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. दरम्यान पोलिसांनी युट्यूबर नमरा कादिर हिला अटक केली असून फरार विराट बेनिवालचा शोध सुरू आहे.

COMMENTS