Homeताज्या बातम्यादेश

नालंदामुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन

नवी दिल्ली ः नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल. नालंदाचे तिच्या प्राचीन भग्नावशेषांच्या जवळ पुनरुज्जीवन

निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींच देशवासियांना खास पत्र
पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर
नरेंद्र मोदी आज तिसर्‍यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली ः नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल. नालंदाचे तिच्या प्राचीन भग्नावशेषांच्या जवळ पुनरुज्जीवन केल्यामुळे जगाला भारताच्या क्षमतेची ओळख होईल कारण ती जगाला हे सांगेल की भक्कम मानवी मूल्ये असलेल्या देशांमध्ये आपल्या इतिहासाचे पुनरुज्जीवन करून एका चांगल्या जगाची निर्मिती करण्याची क्षमता असते, नालंदा भारताच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. 17 देशांच्या मिशन प्रमुखांसह अनेक मान्यवर या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी एक रोपटेही लावण्यात आले. या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि तिसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्या 10 दिवसांत नालंदाला भेट द्यायला मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगत आभार मानले. भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी हे सकारात्मक संकेत आहेत, असे ते म्हणाले. नालंदा हे फक्त एक नाव नाही, ती एक ओळख आहे, एक सन्मान आहे. नालंदा हे मूळ आहे, मंत्र आहे. पुस्तके आगीत जळली तरी ज्ञानाचा नाश होऊ शकत नाही या वस्तुस्थितीची नालंदा ही घोषणा आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. नालंदा जगाचा, आशियाचा आणि अनेक देशांचा वारसा आपल्यासोबत वाहात आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन हे केवळ भारतीय पैलूंच्या पुनरुज्जीवनापुरते मर्यादित नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आजच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतून हे सिद्ध होत आहे असे त्यांनी नालंदा प्रकल्पामध्ये मित्र देशांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत सांगितले. त्यांनी बिहारच्या जनतेची देखील नालंदामध्ये प्रतिबिंबित होत असलेले आपले वैभव परत आणण्याच्या निर्धाराबद्दल प्रशंसा केली. नालंदा हे एकेकाळी भारताची संस्कृती आणि परंपरा यांचे जिवंत केंद्र होते याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की नालंदाचा अर्थ आहे ज्ञान आणि शिक्षण यांचा सतत वाहात राहणारा प्रवाह आणि हा भारताचा शिक्षणाविषयीचा दृष्टीकोन आणि विचार आहे.    

COMMENTS