Nagar News : आश्रमशाळेच्या वृक्षदिंडीने दुमदुमली ढवळपुरी नगरी

Homeताज्या बातम्या

Nagar News : आश्रमशाळेच्या वृक्षदिंडीने दुमदुमली ढवळपुरी नगरी

आश्रमशाळेच्या वृक्षदिंडीने दुमदुमली ढवळपुरी नगरी- वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. अखंड महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत

रेल्वे स्टेशन नजीक रेल्वे इंजिन घसरले | LOK News 24
शरद पवारांची ‘पुलोद’ दलित नेत्याविरूध्दचे षडयंत्र होते!
प्रवराच्या उजव्या कालव्यात अनोळखी प्रेत सापडले

आश्रमशाळेच्या वृक्षदिंडीने दुमदुमली ढवळपुरी नगरी- वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. अखंड महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री विठोबा माऊली यांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व वैष्णव हे दिंडी घेऊन पायी दाखल होत असतात.

आषाढी एकादशीच्या पूर्व दिवशी तोच वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढवळपुरीच्यावतीने भव्यदिव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले.

मागील चौदा वर्षांपासून राष्ट्रीय हरित सेनेच्या अंतर्गत आश्रमशाळेमध्ये वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात येते. पर्यावरण संरक्षण व संवर्धन हे उद्देश ठेऊन सदर दिंडीचे आयोजन केले जाते. ढवळपुरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर व मुख्याध्यापक संदीप महांडुळे यांच्या मार्गदर्शनात हा दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकरी वेशभूषा परिधान करत टाळ, मृदूंगाच्या गजरात भजन, भारूड, गवळण, फुगड्या खेळत व रिंगण सोहळ्यात पाऊली सादर करत कार्यक्रम सादर केला. दिंडीतील बाल वारकऱ्यांची वेशभूषा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत होती.

सर्वांनी यावेळी याची देही याची डोळा सदर कार्यक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना सेवा सोसायटीचे चेअरमन भागाजी गावडे म्हणाले की आश्रमशाळा ढवळपुरीच्या माध्यमातून दरवर्षी वृक्षदिंडीचे आयोजन केले जाते.

यातून पर्यावरण संवर्धना बरोबरच आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला जात आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भावना वाढीस लागून एकोप्याची भावना निर्माण होते. सदर दिंडीच्या आयोजनासाठी आश्रमशाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांना चिंच, जांभूळ, पिंपळ आदी रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी ढवळपुरी गावचे सरपंच भागाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र व्यवहारे, रामदास भालेराव गुरुजी, प्रेमराज राठोड गुरुजी, सेवा सोसायटीचे संचालक मनोहर पारखे, भास्कर बिडे त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करण्यात आले.

COMMENTS