Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न.पा.प्रशासक टिळेकर यांनी शहराची वाट लावली- अशपाक ईनामदार

नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना 17 दिवस झाले प्यायला पाणी मिळेना !

बीड प्रतिनिधी - बीड शहराला गेल्या 17 दिवसापासून प्यायला पाणी मिळेना झाले,त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्याकडे नग

परळमध्ये लिफ्ट कोसळून 12 जण जखमी
त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रातील घटना लाजिरवाणी : त्रिपुराचे उपमुख्यमंत्री
गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गत चांदवड तालुक्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या भव्य २१ शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

बीड प्रतिनिधी – बीड शहराला गेल्या 17 दिवसापासून प्यायला पाणी मिळेना झाले,त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत असून त्याकडे नगरपालीकेचे प्रशासक यांचे शहरातील पाणी प्रश्न सह विविध समस्याकडे साफ दुर्लक्ष आसल्याचे चित्र आहे.न.प.मुख्याधिकारी अंधारे मॅडम,नागरीकांना भर उन्हाळ्या पाण्यासाठी हाल होत आहेत मग तुमची प्रशासकीय यंत्रणा काय कामाची? असा प्रश्न उपस्थित होत असून मुख्य प्रशासक नामदेव टिळेकर यांनी शहराची वाट लावली असल्याची संतप्त प्रतिक्रिया अश्फाक इनामदार यांनी दिली आहे.
शहरातील बार्शी नाका, तेलगाव नाका, हनुमान नगर,गांधी नगर,पूरग्रस्त  कॉलनी, चांदणी चौक सह बर्‍याच भागात गेल्या 17 दिवसांपासून पाणी नाही.  त्यामुळे लोकांच्या घशाला कोरड पडली पाणी प्रश्न गंभीर बनला असून,
बीड नगरपालिका सध्या प्रशासकाचा राम भरोशावर कारभार चालला असून पाणी ,स्वच्छता, विधुत लाईट अश्या अनके समस्याना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे लवकर यावर पर्याय काढावा व नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सर्वसामान्य कडून केली जात आहे.

 शहरातील बर्‍याच भागात पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर माजी सभापती अश्फाक इनामदार यांनी आज दुपारी तेलगाव नाका परिसरातील पाण्याच्या टाकीची पाहणी केली.तेथील कर्मचार्‍यांकडून पाणी पुरवठ्याची माहिती घेतली तर 14 मार्च पासून या भागात पाणी पुरवठा झाला नसल्याचे समोर आले. नागरीकांना भर उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नसेल तर नगर पालिकेतील प्रशासकीय यंत्रणा काय कामाची ? प्रशासक फक्त नावाला आणि केबिन मध्ये खुर्चीवर बसण्यासाठीच आहेत का? असा प्रश्न अश्फाक इनामदार यांनी उपस्थित केला आहे.  प्रशासक टिळेकर यांनी खुर्ची सोडून थोडं  शहरात फिरून स्वतःच्या डोळ्यानी शहाराची सत्य परिस्थिती पाहावी मग लक्षात येईल की स्वच्छ शहर सुंदर शहर आहे की नाही? जागोजागी कचर्‍याचे ढिगारे पडले असून नाल्यातील घाण पाणी ओसंडून रस्त्यावरच वाहत आहेत, बर्‍याच भागात धूर फवारणी झाली नाही,जन्तू नाशक फवारणी झाली नाही, नागरिकांना विविध रोगांस निमंत्रण होत आहे.डेंग्यू,मलेरिया चे रुग्ण वाढत असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्याचा नाकारता येत नाही.

सध्या मुस्लिम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरु असून या महिन्यातच पाणी पुरवठ्याला उशीर का ? लाईट, तांत्रिक बिघाड,पाईप लाईन लिकेज असे वेगवेगळे कारणे सांगून नगरपालिका वेळ मारून घेत आहे की काय अशी शंका नागरिकांतून उपस्थित केली जात आहे.प्रशासकांना आदेश देऊन  ज्या भागात पाणी आले नाही त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा अन्यथा उद्या सकाळी प्रशासक टिळेकर यांच्या केबिन समोरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सभापती अशपाक ईनामदार यांनी केली आहे.

COMMENTS