बेलापूर प्रतिनिधी ः बेलापूर बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रणित शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील

बेलापूर प्रतिनिधी ः बेलापूर बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रणित शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने गावकरी मंडळाने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिले. बेलापूरच्या उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली निवडणुक झाली.
या बैठकीस माजी सरपंच महेन्द्र साळवी, माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे, तबसुम बागवान, चंद्रकांत नवले, मिना साळवी, प्रियंका कुर्हे, सुशीलाबाई पवार, वैभव कुर्हे, उज्वला कुताळ, रविंद्र खटोड, भरत साळुंके, रमेश अमोलिक, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी शरद नवले व अभिषेक खंडागळे यांचे नेतृत्वाखालील गावकरी मंडळाचे मुश्ताक शेख तसेच रविंद्र खटोड, सुधीर नवले, भरत साळुंके, अरुण पा.नाईक यांच्या नेतृत्वाखालील जनता विकास आघाडीचे रमेश आमोलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक होणार अशी चर्चा असताना रमेश आमोलिक यांनी संख्याबळ जमत नसल्याचे लक्षात आल्याने ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे मुश्ताक शेख यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गावकरी मंडळाची विजयी व आभार सभा संपन्न झाली. यावेळी शरद नवले, अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, स्वाती अमोलिक, मोहसीन सय्यद, तबसुम बागवान, उज्वला कुताळ, गोपी दाणी, रफिक शेख, आदिंची भाषणे झाली.
COMMENTS