Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुख्यात गुंड चिराग लोकेची हत्या

मुंबई : मुंबईत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक गुंड आणि टोळ्यामध्ये टोळी युद्ध सुरू आहे. यातुन एकमेकांना ठार मारण्याच्या घ

जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे डोळे आकाशाकडे
पण पाणी मुरते कुठे ?
नगर मनमाड रोडवर अपघात ; २ ठार तर तीन जण जखमी | LOKNews24

मुंबई : मुंबईत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक गुंड आणि टोळ्यामध्ये टोळी युद्ध सुरू आहे. यातुन एकमेकांना ठार मारण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडल्याने खळबळ उडाली आहे. गवळी आणि मोहोळ गँगशी संबंधित कुख्यात गुंड चिराग लोकेची चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडच्या साह्याने हल्ला करून हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
यात त्याची पत्नी पत्नी प्रियंका लोके (वय 28) ही देखील गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नेरुळमधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.या घटनेमुळे खळबळ उडाली असून टोळी युद्ध पेटण्याची शक्यता व्यक केली जात आहे. आरोपी अरविंद रामनाथ सोधा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन जणांवर नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिराग लोके हा अरुण गवळी व पुण्यातील खून झालेल्या शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करत होता. चिरागची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पाहत नेरुळ पोलिसांनी त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मंगळवारी चिराग व त्याची पत्नी प्रियंका हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होते. यावेळी आरोपी अरविंद सोडा व त्याच्या साथीदारांनी चिराग लोकेवर लोखंडी रॉडने हल्ला केला.

COMMENTS