Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इचलकरंजी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून

इचलकरंजी / प्रतिनिधी : वखार भाग येथे एका निर्जन स्थळी डोक्यात डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून करण्यात आला. हा मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याच

अत्याचारप्रकरणी युवकास अटक
शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
सन 1978 ची पुनरावृत्ती करत इतिहास घडवा : गौरव नायकवडी यांचे आष्टा येथे आवाहन

इचलकरंजी / प्रतिनिधी : वखार भाग येथे एका निर्जन स्थळी डोक्यात डोक्यात दगड घालून एका तरुणाचा खून करण्यात आला. हा मृत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा प्राथमिक तपासात पुढे आले आहे. खुनाचे नेमके करण समजू शकलेले नाही. शहरात गुन्हेगारीची प्रमाण वाढत असताना त्यात या खुनाच्या घटनेमुळे भर पडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील वखार भाग येथे मोहन आर्केडकर बाजूला एका पडीक जागा आहे. या ठिकाणी सकाळी एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. याठिकाणी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले आहेत. दरम्यान, या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून झाल्याचे समोर आले आहे. दगडाच्या घावाने डोके जमिनीत खोलवर रुतले आहे. पोलिसांनी पंचनाम केला असून मृताची प्राथमिक ओळख पटली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बी. बी.महामुनी दाखल झाले आहेत.

COMMENTS