Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी येरवडा कारागृहातून पसार

पुणे ः पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशन भागात सन 2015 मध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील एक आरोपीस न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावलेली

येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात आढळला मोबाईल संच
अट्टल गुन्हेगार येरवडा जेलमधून फरार
येरवडा कारागृहात कैद्याची हत्या

पुणे ः पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशन भागात सन 2015 मध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील एक आरोपीस न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावलेली होती. सदर कैद्याचे कारागृहात चांगले वर्तन असल्याने त्यास येरवडा खुला कारागृहात पाठविण्यात आले. परंतु, खुल्या कारागृहातून सदर कैदी कारागृह पोलिसांची नजर चुकवून त्यांचे रखवालीतून पसार झाला आहे. राजू पंढरीनाथ दुसाने (वय-43,रा. महालगाव, ता.वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे.
या प्रकरणी तुरुंग पोलिस शिपाई अविनाश गोविंद पवार (वय-42) यांनी आरोपी राजू दुसाने विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीवर भान्यास कलम 262 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह नियमानुसार तक्रारदार तुरुंग पोलिस शिपाई अविनाश पवार हे येरवडा खुले कारागृह येथे 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी बंदी गिणती करत होते. त्यावेळी कैदी राजू दुसाने हे शिक्षा झालेला बंदी आढळून न आल्याने कर्तव्यावरील अधिकारी व अंमलदार यांनी येरवडा खुले कारागृहात सर्वठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. संबंधित कैद्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेान येथे सन 2015 मध्ये खुनाचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यास या गुन्हयात पुणे न्यायालयाने 24 फेबु्रवारी 2021 रोजी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. सदर दंड न भरल्यास तीन महिने कारावासी शिक्षा न्यायालयाने सुनावलेली होती. राजु दुसाने हा कारागृहात असताना त्याची वर्तणूक चांगली असल्याने त्यास खुले कारागृहात शेतीच्या कामासाठी पाठवले होते. परंतु त्याठिकाणावरुन तो तुरुंग अधिकारी व बंदोबस्तावरील पोलिस यांची नजर चुकवून खुले कारागृहातून कायदेशीर रखवालीतून पळून गेला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार एस जायभाये करत आहे.

COMMENTS