मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट बेचिराख होता होता राहिला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट बेचिराख होता होता राहिला…

सावेडीच्या कचरा डेपोत लागली आग, महत्प्रयासाने मिळवले नियंत्रण

अहमदनगर/प्रतिनिधी ः कोरोना काळ ऐन बहरात असताना सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावेळी नगरच्या मनपानेही पुढाकार घेऊन सावेडीच्या कचरा डेपोत अ

नव्या पिढीची कविता प्रेरणा देणारी : कवी प्रकाश घोडके
एसबीसी प्रवर्गाच्या साप्ताहिक आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ढाकणे यांची गांधीगिरी करत पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः कोरोना काळ ऐन बहरात असताना सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावेळी नगरच्या मनपानेही पुढाकार घेऊन सावेडीच्या कचरा डेपोत असा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काम सुरू झाले. पण पुढे कोरोना काळ ओसरला व मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्टही दुर्लक्षित झाला. त्यातून आता ऑक्सिजन निर्मिती कधी होईल, हे सांगता येत नाही. पण दोन दिवसांपूर्वी हा प्लॅन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचिराख होता होता राहिला. सावेडीच्या कचरा डेपोतील वाळलेले गवत व जुना पडून असलेला कचरा पेटल्याने या आगीच्या झळा ऑक्सिजन प्लॅन्टपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र, मनपाच्याच अग्निशामक दलाने महत्प्रयासाने ही आग आटोक्यात आणली व हा प्लान्टही वाचवला.

महापालिकेच्या बंद झालेल्या सावेडी कचरा डेपोत सोमवारी (27 मार्च) रात्री उशिरा व मंगळवारी दुपारी अशा सलग दोन दिवस मोठी आग लागली. मंगळवारी (28 मार्च) दुपारी लागलेली आग ऑक्सिजन प्लॅन्टच्या जवळ पोहोचल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांसह डेपोतील कर्मचार्‍यांचीही धावपळ उडाली. पण, अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा अखंड मारा करून तात्काळ आग आटोक्यात आणल्याने ऑक्सिजन प्लॅन्ट थोडक्यात बचावला.

सावेडी कचरा डेपोच्या जागेत काही जुना कचरा पडून आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. या गवताशेजारीच नव्याने ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी करण्यात आलेली आहे. हा प्लॅन्ट अद्याप कार्यरत झालेला नाही. मंगळवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेथील कचरा व गवताला अचानक आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा गवताला आग लागली. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांकडून ही आगही विझवण्यात आली. मात्र, ही आग ऑक्सिजन प्लॅन्टजवळ पोहोचल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. महापालिकेच्या तेथील कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली व ऑक्सिजन प्लॅन्ट थोडक्यात बचावला. ऑक्सिजन प्लॅन्टला पुन्हा आगीची झळ पोहोचू नये, यासाठी जेसीबी मागवून गवत व प्लॅन्ट यामध्ये चर खोदण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

COMMENTS