घोडबंदरच्या गौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना नियमित घरभाडे देण्यासाठी बैठक घेणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घोडबंदरच्या गौरव एनक्लेव सोसायटीतील कुटुंबांना नियमित घरभाडे देण्यासाठी बैठक घेणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- मीरा भाईंदर येथील गौरव एनक्लेव को-ऑप. हौसिंग सोसायटीची इमारत पुनर्विकासासाठी रिकामी केल्यामुळे संबंधित विकासकाने येथील रहिवाशांना करारानुसार

हिवाळ्यात लहान बाळांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा
चक्क उद्धव ठाकरे यांच्या बंगल्या शेजारी आढळला खुंखार अजगर | LOK News 24
सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश !

मुंबई :- मीरा भाईंदर येथील गौरव एनक्लेव को-ऑप. हौसिंग सोसायटीची इमारत पुनर्विकासासाठी रिकामी केल्यामुळे संबंधित विकासकाने येथील रहिवाशांना करारानुसार नियमितपणे भाडे देणे आवश्यक आहे. ते भाडे मिळवून देण्यासाठी विकासकाबरोबर बैठक घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत रवि राणा, गीता जैन या सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकासमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर भागात गौरव एनक्लेव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची तळमजला अधिक ७ मजली इमारत १९९५ मध्ये बांधण्यात आली आहे. सदर इमारत धोकादायक ठरल्याने ती २०१३ मध्ये पाडण्यात आली, त्यानंतर सीआरझेडचा भाग वगळून या इमारतीला २०१९ मध्ये २१ मजल्याची परवानगी महानगरपालिकेने दिली, मात्र या इमारतीसंदर्भात काही वाद उद्भवल्याने २०१९ मध्येच या इमारतीच्या बांधकामाची परवानगी रद्द केली. सदर विकासक उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने त्यात स्थगिती दिली, ही स्थगिती आजही कायम आहे, असेही नगरविकासमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या विकासकाने नगरविकास विभागाकडे अपील केले होते. वादग्रस्त सर्वे क्रमांक असतील ते बाजूला ठेवून नियमाप्रमाणे कागदपत्रे तपासून महानगरपालिकेने नगररचना नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत, यामुळे २३३ वंचित कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगून महानगरपालिका आयुक्तांनी विकासक आणि या इमारतीतील रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घ्यावी आणि विकासकाकडून येथील रहिवाशी कुटुंबांना नियमितपणे घरभाडे मिळवून देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही शेवटी नगरविकासमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS