Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईच्या डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांस

वनव्याच्या ज्वालांनी वैराटगडावर लखलखाट: विघ्नसंतोषी लोकांमुळे पर्यावरणाचा र्‍हास
निळवंडे कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू– नामदार थोरात
मनसे नेते अमित ठाकरे सांगली शहरात दाखल 

मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. म्हाडाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला मुंबईत 500 चौरस फुटांचे घर अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. डबेवाल्यांच्या संघटनेने आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी उपमुख्यमंत्री आणि डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये बैठक झाली. सह्याद्री अतिथीगृहावरील आजच्या बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी उपस्थित होते.

मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रियांका होम्स रिलिटीकडून 30 एकर जागा देण्यात आली आहे. डबेवाल्यांना 500 चौरस फुट क्षेत्रफळाचे घर अवघ्या 25 लाखांमध्ये मिळणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

COMMENTS