Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल

प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी

मुंबई ः मुंबईकरांसाठी शुक्रवारची सकाळ उजाडली तीच गर्दीनेमध्य रेल्वेच्या 3 दिवसीय महामेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसाठी प्रवास करणे अत्यंत जिकीरीचे ठरणार

स्वामी सर्वांचे रक्षणकर्ते… स्वामीच जगाचे तारणहार… (Video)
ईडीवर माझा विश्वास; मी पळकुटा नाही – संजय राऊत
 मंत्री मंडळात  एकही महिला नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे – अजित पवार

मुंबई ः मुंबईकरांसाठी शुक्रवारची सकाळ उजाडली तीच गर्दीनेमध्य रेल्वेच्या 3 दिवसीय महामेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसाठी प्रवास करणे अत्यंत जिकीरीचे ठरणार असून शुक्रवार सकाळापासून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरूवारी मध्यरात्री साडे बारापासून सुरू झालेला हा विशेष ब्लॉक रविवार दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र यामुळे अनेक गाड्या, लोकल्स रद्द करण्यात येणार असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेवर रोज सुमारे 70 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. शुक्रवारपासून अनेक गाड्या रद्द झाल्याने लवकरात लवकर लोकल पकडून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लोकांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली. लोकल ट्रेन्सही दुथडी भरून वाहत असून कल्या, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा नाही. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने घेतला हा जम्बो ब्लॉक सुरू आहे. यामुळे लोकलच्या एकूण 930 फेर्‍या रद्द करण्यात येणार असून शुक्रवारी 161, शनिवारी 534, तर रविवारी 235 लोकल फेर्‍या रद्द होतील. ऑफीसला जाणार्‍या लोकलच रद्द झाल्याने प्रवास करायचा कसा असा प्रश्‍न लोकांच्या मनात असून त्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. या ब्लॉकमुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणार्‍या काही गाड्या रद्द झाल्या आहेत. अपसाईड वरील स्लो व फास्ट लाईन सुरू आहे. काही प्रमाणात लोकल गाड्या रद्द केल्या असून सुरु असलेल्या लोकल गाड्या पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. डाऊन साईडची फास्ट ट्रॅक वरील लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे. स्लो ट्रॅक वर लोकल गाड्या उशिराने सुरु असल्याने मुंबई कडून कर्जत व कसार्‍याला जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेने मेगाब्लॉकची घोषणा केल्याने अनेक प्रवासी सकाळी घरातून लवकरच बाहेर पडले. मध्येच अडकायला लागू नये, गर्दीचा सामना करावा लागू नये म्हणून अनेक प्रवाशांनी सकाळी लोकलची गाडी पकडण्यास प्राधान्य दिले. मात्र तरीही अनेक गाड्या रद्द झाल्याने, तर काहींना विलंब झाल्याने लोकलमध्ये आणि स्टेशनवर गर्दीचा महापूर दिसत आहे. कुर्ला स्थानकातही अनेक लोकल उशिराने धावत आहेत. अंबरनाथ स्टेशनहून 8.27 ला सुटणारी ट्रेन आजच्या गोधंळामुळे सुमारे 10-12 मिनिटं उशीराने आली. 8.40 च्या सुमारास आलेली ही ट्रेन पाहताच प्रवाशांची झुंबड उडाली. दोन दिवसापूर्वी एका मोटरमनचं रिटायरमेंट सोहळा होता. त्यामुळे गाडी फुलांनी सजवलेली होती. मात्र ही ट्रेन स्टेशनवर येताच ताटकळलेल्या प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि नेहमीच्या पद्धतीने गाडी पूर्णपणे थांबण्याच्या आधीच आतमध्ये पटापट उड्या टाकून सीट मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. मेगाब्लॉकमुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवर थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसत होते. स्टेरशनवर गर्दी आणि लोकलमध्येही गर्दीच. गच्च भरलेली लोकल स्टेशनवर थांबायच्या आतच लोकांची आत शिरण्याची धडपड सुरू होती.

COMMENTS