Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई हादरली! धावत्या टॅक्सीत गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या

धनलक्ष्मी शाळेत आदिवासी लोकजिवनाची झलकी
अहिल्यानगर : स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन-प्रकट दिनाची उत्साहाने सांगता
95 लाखांची रोखड जप्त; सातारा तालुक्यातील घटना

मुंबई प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या टॅक्सीमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार केला. अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला मालवणीला सोडून दिले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक देखील केली आहे. सलमान शेख आणि टॅक्सी चालक प्रकाश पांडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. टॅक्सी चालकावर सलमानला मदत केल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS