Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कु. मृणाल पवार हिची नवोदय विद्यालयासाठी निवड

कुडाळ : काळोशी (पुर्नवसित), ता. सातारा येथील जिल्हा परिषद शाळेतील मृणाल प्रमोद पवार हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षेत यश मिळविले

आगामी निवडणुकांमध्ये एकी कायम दाखवा : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे आवाहन
मोबाईल कंपनीकडून कुडाळ ग्रामपंचायतीला एक लाख नव्वद हजार पाचशे रुपायाची भरपाई
ना. रामराजे यांनी पदाचा वापर फलटणच्या जनतेसाठी करावा : अनुप शहा

कुडाळ : काळोशी (पुर्नवसित), ता. सातारा येथील जिल्हा परिषद शाळेतील मृणाल प्रमोद पवार हिने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षेत यश मिळविले आहे. याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिला रामदास गोळे, प्रवीण सुळके, अनुजा पवार, संतोष ढाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
ग्रामीण भागातील अनेक या परीक्षेसाठी अर्ज भरतात. 80 प्रश्‍नांच्या या परीक्षेत तीन-चार प्रश्‍नांच्या चुका झाल्या तरी निवड होण्याची खात्री नसते. यासाठी अतिशय विशेष तयारी करून घ्यावी लागते. यासाठी नियमित अभ्यास, सराव, जिद्द, चिकाटीने कु. मृणाल हिने यश संपादन केले आहे. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, विस्तारधिकारी सुजाता जाधव, केंद्र प्रमुख भस्मे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्रिया चोरगे सर्व सदस्य, कोडोलीच्या सरपंच स्वाती भोसले व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

COMMENTS