Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौ.के.ए.के. महाविद्यालयात मेंदी प्रशिक्षण शिबीर संपन्न

बीड प्रतिनिधी - येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयातील गृहशास्त्र विभाग व जन शिक्षण संस्थान,बीड य

मनोरुग्ण मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी – राम कटारे
पुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना
अखेर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

बीड प्रतिनिधी – येथील सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयातील गृहशास्त्र विभाग व जन शिक्षण संस्थान,बीड यांच्या संयुक्त  विद्यमाने दोन दिवसीय मेंदी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.दीपाताई क्षीरसागर व प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांची प्रेरणा होती. तज्ञ प्रशिक्षक म्हणून जनशिक्षण संस्थान,बीड येथील सौ.कविता जोशी,सौ.वैशाली थिगळे,श्रीमती.नंदा साळुंके,श्रीमती निशा पठाण यांनी काम पाहिले.
प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींनी प्रथम मुलभूत डिझाईनचे पेपर ड्राईंग केले.त्यानंतर त्यांना मेंदी कोन तयार करणे,साधी मेंदी पेपरवर काढणे,त्यानंतर हातावर मेंदी काढणे शिकवण्यात आले.तसेच साधी मेंदी, इन्स्टंट मेंदी, अरेबिक मेंदी, रंगीत मेंदी, ग्लिटर मेंदी इ. प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे होते.कार्यक्रमासाठी पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतीश माऊलगे, जन शिक्षण संस्थानच्या कार्यक्रमाधिकारी सौ.सीमाताई मानुरकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ.खांदाट यांनी दोन दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे भारतीय सणामध्ये मेंदीचे महत्व असून या बेसिक शिक्षणातून त्यांनी आपला कल ओळखावा असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ.शिवाजी शिंदे यांनी मेंदी प्रशिक्षण शिबीरास शुभेच्छा दिल्या व विद्यार्थिंनींना स्व-कौशल्य विकसित करून मेंदी प्रशिक्षणाद्वारे त्यांनी व्यावसायिक मेंदी आर्टीस्ट व्हावे असा संदेश दिला मेंदी हा महिलांच्या जिव्हाळयाचा विषय असून त्यातील आधुनिक व नाविन्यपूर्ण प्रकार देखील विद्यार्थिनींनी या शिबीराच्या माध्यमातून आत्मसात करावे असे आवाहन केले.मान्यवरांचे आभार प्रदर्शन डॉ.मंजू जाधव केले.

COMMENTS