Homeताज्या बातम्याक्रीडा

एमएस धोनीची 7 नंबरची जर्सी होणार निवृत्त

नवी दिल्ली प्रतिनिधी - भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अनेका भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी क

श्रीलंकेला प्रयान करण्यापूर्वी गौतमचा पत्रकारांशी गंभीर सामना
भारतीय संघाने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास
नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक

नवी दिल्ली प्रतिनिधी – भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अनेका भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो तीन वर्षांपूर्वीच निवृत्त झाला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. मीडियातील रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने धोनीने त्याच्या कारकिर्दीत नेहमीच परिधान केलेला जर्सी क्रमांक 7 निवृत्त केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाकडून कोणीही 7 क्रमांकाची आयकॉनिक जर्सी घालू शकणार नाही. वर्ल्डकप विजेता कर्णधार धोनीने क्रिकेटमध्ये दिलेल्या त्याच्या योगदानाच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याचा जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंनाही याबद्दल माहिती देताना सांगितले आहे की यापुढे कोणासाठीही 7 आणि 10 क्रमांकाची जर्सी उपलब्ध असणार नाही.

COMMENTS