भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या चाहत्यांना धक्का देत असते. यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांना असाच एक धक्का दिला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या चाहत्यांना धक्का देत असते. यावेळीही त्याने आपल्या चाहत्यांना असाच एक धक्का दिला आहे. धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या वेषात दिसत आहे. धोनीचा हा फोटो पाहून चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. धोनीचा हा फोटो पाहून लष्करानंतर त्याला पोलीस खात्यातही अधिकारी पद देण्यात आलं आहे का अशी चर्चा रंगली आहे. पण तसं काही नसून धोनी खरोखर पोलीस अधिकारी झालेला नाही. किंवा त्याने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलेलं नाही. हा फोटो धोनीच्या नव्या जाहिरातीमधील आहे.
COMMENTS