Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान 

दिल्ली येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्काराचे वितरण

पुणे प्रतिनिधी - शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मंचर ता.आंबेगाव येथील आदर्श शिक्षिका मृणाल गांजाळे यांना दि.५ रोजी शिक्षक द

शिर्डीसाठी 650 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क
केतकी चितळेला पोलिसांनी केली अटक ; कार्यकर्त्यांनी फेकली शाई
भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

पुणे प्रतिनिधी – शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मंचर ता.आंबेगाव येथील आदर्श शिक्षिका मृणाल गांजाळे यांना दि.५ रोजी शिक्षक दिनी दिल्ली येथे आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आला. मंचर ता. आंबेगाव येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या मोलाचे योगदानाबद्दल त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार जाहीर झाला होता. त्याचे वितरण आज दि. ५ रोजी दिल्ली येथे देशाच्या राष्ट्रपती महामही द्रोपती मुर्मु, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शुभहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला आहे. देशात एकूण पन्नास शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला असून महाराष्ट्रातून मृणाल गांजाळे या एकमेव शिक्षिका या पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. नवी दिल्ली येथील विज्ञानभवनामध्ये या पुरस्काराचे वितरण झाले असून प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

COMMENTS