Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात सायबर सुरक्षा कार्यक्रम उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी - पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर आणि सायबर पोलिस स्टेशन व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एमकेसीएलचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र सीडॅकपेस

टाकळी कडेवळीत डॉ. आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी
भाजपच्या उत्तर विभाग उपाध्यक्षपदी पानसरे यांची नियुक्ती
सत्कार्यामुळे माणूसच माणसांचे जग सुखी करतो ः प्राचार्य टी.ई. शेळके

कोपरगाव प्रतिनिधी – पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर आणि सायबर पोलिस स्टेशन व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एमकेसीएलचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र सीडॅकपेस कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सायबर सिक्युरिटी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात केले होते.कोपरगांव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लासनकर क्लासचे संचालक लक्ष्मण लासनकर, सी डॅक पेस कॉम्प्युटरचे संदीप पोटे व सौ अनिता चव्हाण, सुनील चव्हाण तसेच विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद  कोर्‍हाळकर  उपस्थित होते. सध्या डिजिटल  युग असल्याने लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन पहायला मिळतोय मात्र या तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हेगारीचे  प्रमाण वाढत चालेले असून अनेक युवक या सायबर गुन्हाला बळी पडत आहे. कित्येकांना मोबाईल फोनवर वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस इतर आमिष दाखवून लिंकद्वारे लाखो रुपयांना या सायबर गुन्हेगारांनी गंडा घातल्याचे दिसून येत आहे. शालेय जीवनात देखील या स्मार्ट फोनचा  किती व कसा वापर करावा की ज्या मुळे सायबर गुन्हेगारीला आळा बसेल या हेतूने  अहमदनगर पोलीस अधिक्षक कार्यालय सायबर पोलीस यांच्या वतीने जिल्ह्यात सर्व शाळा महाविद्यालय सायबर सिक्युरिटी व जनजागृती विविध माध्यमातुन केली जात आहे. त्या अनुषंगाने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात सायबर सिक्युरिटी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, लासनकर क्लासेसचे लक्ष्मण लासनकर, सी डॅक पेस कॉम्प्युटरचे संदीप पोटे, अनिता चव्हाण, सुनील चव्हाण तसेच श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोर्‍हाळकर,उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी व जनजागृती विषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघूनाथ लकारे  सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले. पर्यवेक्षक उमा रायते रायते यांनी स्वागत केले तर बलभीम उल्हारे यांनी आभार मानले.

COMMENTS