Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

नांदेड : गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँगे्रसचे उमेदवार वसंत चव्हाण निवडून येत त्यांनी भाजपच्य

राज्यपालांचा गैरसमज झाल असावा : महसूल मंत्री थोरात
Raigad :रोह्यात रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा भव्य मेळावा,| LokNews24
ओबीसी शिष्टमंडळाची 29 सप्टेंबरला राज्य सरकारसोबत बैठक

नांदेड : गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँगे्रसचे उमेदवार वसंत चव्हाण निवडून येत त्यांनी भाजपच्या उमेदवाराला धोबीपछाड दिली होती. मात्र खासदार होवून दोन-अडीच महिने होत नाही तोच काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे यकृताच्या आजारामुळे निधन झाले आहे. खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हैदराबादमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने नांदेड जिल्ह्यावरच नाही तर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसंत चव्हाण यांना गेल्या आठवड्यामध्ये श्‍वास घेण्याचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अचानक त्यांची तब्येत प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा तातडीने हैदराबाद येथील किंग्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, हैदराबाद येथील या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नांदेडमधून विजय मिळाला होता. त्यांनी भाजपचे तत्कालीन खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. नांदेडमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र असे असले तरी नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंत चव्हाण यांनी भाजपला धक्का देत काँग्रेसकडे विजय खेचून आणला होता. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले त्यावेळी वसंत चव्हाण देखील भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा रंगली होती, मात्र त्यांनी काँगेसमध्ये राहुन देखील नांदेड लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

COMMENTS