Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार नीलेश लंकेंना आत्ताच उपरती का ?

एलसीबीच्या विरोधात उपोषण करण्यामागचे नेमके गौडबंगाल काय ?

अहमदनगर ः अहमदनगरचे खासदार नीलेश लंके गेल्या काही दिवसांपासून आपल्या आंदोलनामुळे चर्चेत येतांना दिसून येत आहे. दूधाचे दर आणि कांद्याच्या दराविषयी

खा. नीलेश लंके यांचा राजधानीत चक्क रिक्षातून प्रवास
खासदार लंके यांचा शेवगावात संविधान देऊन सन्मान
मांडवगणमध्ये खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार

अहमदनगर ः अहमदनगरचे खासदार नीलेश लंके गेल्या काही दिवसांपासून आपल्या आंदोलनामुळे चर्चेत येतांना दिसून येत आहे. दूधाचे दर आणि कांद्याच्या दराविषयी आंदोलन केल्यानंतर खा. लंके यांनी आता पोलिसांच्या गैरकारभारविरोधात उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र खासदार लंके यांना आत्ताच का उपरती झाली हा संशोधनाचा विषय आहे.
स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीचे प्रमुख काम शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या गुन्ह्यावर लक्ष केंद्रीत करून त्या गुन्ह्यांची उकल करणे. ते काम एलसीबी तत्परतेने करत असतांना खासदार लंके यांनी एलसीबीवर आर्थिक देवाण-घेवाणीचे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचे आरोप केले आहेत. त्यातच खासदार लंके यांचा रोख एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडेच दिसून येतो. त्यांची बदली करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील गुन्हेगारीचा पाढाच वाचला आहे. शहरामध्ये कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार पोलिस स्टेशन असून, त्याठिकाणी स्वतंत्र प्रभार असलेले पोलिस निरीक्षक असतांना त्यांच्याविरोधात खासदार लंके कुठेही तक्रार करतांना दिसून येत नाही. त्यांचा संपूर्ण रोख एलसीबीच्या अधिकार्‍यांवर आहेत. एलसीबीतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आज चालू आहे का, आजचे विद्यमान खासदार तेव्हा आमदार असतांंना देखील तो गैरव्यवहार सुरू होता. मात्र खासदार महोदयांना आत्ताच का उपरती झाली हा संशोधनाचा विषय आहे. ज्या सुवर्णकारांचा खासदार लंके यांनी उल्लेख करत, त्यांचा छळ झाल्याचे म्हटले आहे, त्यांचे आणि खासदार यांचे लांगे बांधे काय आहेत ? याचा देखील विचार करण्याची गरज आहे. खासदार लंके हे नेहमीच सर्वसामान्यांचे नेते म्हणून परिचीत असले तरी, त्यांचा हा लढा मात्र कुणाला वाचवण्यासाठी आहे ? खरंतर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असतांना, आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न मांडण्याची, त्यासाठी निधी आणण्याची आवश्यकता असतांना खासदार महोदय एका पोलिस निरीक्षकाच्या बदलीसाठी आग्रही दिसून येत आहे, त्यामुळे इथेच कुठेतरी पाणी मुरतांना दिसून येत आहे.

एलसीबीकडून क्राईम बीटच्या कोणत्या पत्रकारांना हफ्ते – एलसीबीकडून शहरातील क्राईम बीट पाहणार्‍या पत्रकारांना दरमहिन्याकाठी हफ्ता दिला जातो. तो कुणाकडून दिला जातो ? तो हफ्ता गोळा करणारे पत्रकार कोण? त्यांना एलसीबीमध्ये काय चालते ? याची इत्यंभूत माहिती असून, त्यांना खासदार लंके यांचा पोलिसांविरोधातील उपोषण देखील कोणत्या बाबींसाठी सुरू आहेत, याची माहिती नाही का ?

आज सोबत असणारे मागे कुणाच्या सोबत होते ? – खासदार लंके यांनी पोलिसांविरोधात उपोषण सुरू केल्यानंतर काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेसह अनेक पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. मात्र आज या आंदोलनात सहभाग नोंदवणारे गेल्या काही दिवसांपूर्वी कुणासोबत होते, त्याचा विचार देखील खासदार लंके यांनी करण्याची गरज आहे.

लंके यांना खासदार होण्यासाठी कुणी ‘देव’ डोक्यावर घेतले ? – नीलेश लंके यांना खासदार करण्यासाठी अनेकांनी ‘देव’ डोक्यावर घेतले तर, अनेकांनी त्यांचा पराभव व्हावा यासाठी ‘देव’ पाण्यात ठेवले, याचा खासदार लंके यांनी विचार करण्याची गरज आहे.  

COMMENTS