Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार लंके यांचे निवडणूक निधी देणार्‍यांसाठीच आंदोलन ?

सुवर्णकार, श्रीगोंद्यातील त्या मुस्लिम बांधवाने किती निधी दिला ? खासदार महोदयांनी जाहीर करावे ?

अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्याचे खासदार नीलेश लंके यांनी पोलिसांच्या गैरकारभाराविरोधात आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यामागचे गौडबंगाल काय एक खासदार म

खासदार नीलेश लंकेंना आत्ताच उपरती का ?
शासकीय कार्यालये आज बंद करण्याचा खा. लंके यांचा इशारा
खा. लंके यांनी बनपिंप्री येथील टोल वसुली थांबविली

अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्याचे खासदार नीलेश लंके यांनी पोलिसांच्या गैरकारभाराविरोधात आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यामागचे गौडबंगाल काय एक खासदार महोदय एलसीबीच्या पोलिस निरीक्षकाच्या बदलीसाठी चक्क उपोषण करतो, त्यामुळे मतदारसंघातील प्रश्‍न संपले की काय असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो. शिवाय एलसीबीच्या पोलिस निरीक्षकांची बदली होवून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, मात्र लोकसभा निवडुकीत आपल्याला निधी देणार्‍या काही गुन्हेगारी पार्श्‍वभूमींच्या लोकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळेच खासदार महोदयांनी आंदोलनाचे आणि उपोषणाचे हत्यार उपसल्याचे दिसून येत आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी खासदार महोदयांनी श्रीगोंद्यातील एका मुस्लिम तरूणाचे नाव घेत, हा तरूण गायी-म्हशीचा गोठा टाकून दूध व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तसेच या मुस्लिम तरूणाला श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक भोसले त्रास देत असल्याचा आरोप करत आहे. मात्र याच मुस्लिम तरूणाने खासदार लंके यांना लोकसभा निवडणुकीत एक लाख रूपयांचा निधी चेकद्वारे दिला होता. त्याचा व्हिडिओ याच तरूणाने सोशल मीडियावर टाकला होता. तो आमच्या हाती आला असून, यासारख्या अनेकांना ज्यांनी पक्षनिधी लंके यांना दिला होता, त्यांना वाचवण्यासाठीच हा आमरण उपोषणाचा फंडा खासदार महोदय वापरतांना दिसून येत असल्याचा आरोप होत आहे. मात्र यातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न नक्कीच सुटणार नाहीत, हे नक्कीच. खासदार महोदयांनी ज्या सुवर्ण व्यावसायिकांचे नाव घेतले आहे, त्यांनी देखील खासदार महोदयांना किती निवडणूक निधी दिला, आणि तो कुठून आणला, तसेच त्या श्रीगेांद्यातील मुस्लिम बांधवाने देखील दिलेला एक लाख रूपयांचा चेकसाठी पैसे कुठून आणले, त्यांचा व्यवसाय काय, या सर्व बाजूंची पोलिसांनी चौकशी केल्यास या सर्वांचे हात दगडाखाली अडकल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आपल्या निवडक कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठीच खासदार महोदय जीवांची बाजी लावतांना दिसून येत आहे. यातून सर्वसामान्यांचे कोणतेही कल्याण होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यातून निवडक व्हाईट कॉलर म्हणून वावरणार्‍यांचे उखळ पांढरे करून घेण्यासाठीच हा उपदव्याप खासदार लंके यांनी मांडल्याचे दिसून येत आहे.

हाच तो श्रीगोंद्यातील गुन्हा खासदारांकडून कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न
श्रीगोंद्यातील तेजस कोंडे या तरूणाने जो अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतो. या युवकाने आतिक गुलाम हुसेन कुरेशी, रा. श्रीगोंदा याच्ंयाविरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एफआयआर क्रमांक 0682 असून, महाराष्ट्र पशु संंरक्षण अधिनियम 1976 नुसार कलम 5 बी, 9, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, कुरेशी याने कत्तल करण्यासाठी जनावरे डांबून ठेवली आहे. त्यापूर्वी त्याने पोलिस निरीक्षक भोसले यांना माहिती देवून खात्री करण्याची विनंती केली. त्यानंतर जकातेवस्ती येथे गेल्यानंतर तिथे गोवंश जातीचे 19 जिवंत वासरे, 1 गिर गायीचे खोंड वय 10 दिवस, 1 देशी गायी, 2 जर्सी गायी डांबून ठेवल्याचे दिसून आले. या जनावरांसाठी कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता त्यांना कू्ररपणे दाटीवाटीने डांबून ठेवल्याचे दिसून येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या कुरेशी यांच्यावर हा पहिलाच गुन्हा नसून, त्याच्यावर गुन्हा रजि. क्रमांक 766/2023 नुसार भादंविक 307, 353, 323, 427, 504, 506, 34 नुसार गुन्हे दाखल आहेत. असे असताना देखील खासदार महोदय आरोपीच्या सुटकेसाठी पोलिसांवर दबाव आणत असतील तर, लोकप्रतिनिधींकडून कायदा मोडीत काढण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS