नाशिक - एकीकडे म.न.पा.आयुक्त गंगापुर धरण पूर्ण भरले म्हणुन जलपुजन करता व दुसरीकडे अनेकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असुन अनेकांना टॅंक
नाशिक – एकीकडे म.न.पा.आयुक्त गंगापुर धरण पूर्ण भरले म्हणुन जलपुजन करता व दुसरीकडे अनेकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असुन अनेकांना टॅंकर्स द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.आजही नाशिक शहरातील अनेक भाग प्रामुख्याने पंचवटी मधील मखमलाबाद रोड वरील म.न.पा.कॅालनी,मानकर मळा,स्वामीविवेकानंद नगर,उदय नगर,वडजाईमाता नगर,विद्यानगर, तांबे मळा,प्रथमेश पार्क ,सत्यदेव नगर,काकड नगर,परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकर्स द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.सदरील कमीदाबाने पाणीपुरवठा करुन केवळ कंञाटदारांना फायदा व्हावा यासाठीच क्रुञीम पाणी टंचाई भासवली जात आहे.मोठ्याप्रमाणात खर्च करुन पाण्याच्या लाईन व टाक्या बांधण्यात आल्या असल्या तरी परिसरातील पाण्याची समस्या अद्याप सुटली नसल्याने हा खर्च केवळ राजकीय नेते,कंञाटदार,अधिकारी,यांच्या फायद्यासाठीच करण्यात आल्याचे आरोप यावेळी ॲड.सुरेश आव्हाड यांनी केले असुन पाणीपुरवठा होत नसला तरी हजारो रुपये पाण्याची बिले येत असुन सदरील प्रकार हा निंदणीय असुन जो पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही,तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे पाणीबिले आकारण्यात येऊ नये.त्वरित सदरील भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
COMMENTS