Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा ; तीन आरोपी अटकेत, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्

‘वंदे मातरम्‌’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास प्रारंभ
विद्यार्थ्यांनो, पुस्तके वाचा, स्वतःला सक्षम बनवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदपुरात भाजपची सवाद्य दुचाकी रॅली

गेवराई पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी 17 मोटारसायकली, 16 मोटारसायकल सांगाडे (चेसिस) तसेच 30 इंजिनांसह मोटारसायकलचे विविध पार्ट असा एकूण 50 पेक्षा अधिक वाहनसाहित्य जप्त केले आहे.
बीड जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणार्‍या गुन्ह्यांचा तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी डीबी पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. मागील दोन महिन्यांत घडलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी गेवराई शहर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून संशयितांची ओळख पटवून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. अखेर 5 मार्च 2026 रोजी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 1) सय्यद अब्रार सय्यद जैनुद्दीन (वय 31, व्यवसाय – गॅरेज, रा. शहा शौकत कॉलनी, एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर), 2) सय्यद इमदाद हुसेन अरशद हुसेन (वय 22, व्यवसाय – प्लंबिंग, रा. मोमीनपुरा रोड, बीड), 3) शेख आसेम शेख मझर (वय 32, व्यवसाय – भंगार व्यवसाय, रा. नेकनूर, जि. बीड), यांचा समावेश आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तपासात आरोपी चोरी केलेल्या मोटारसायकली नेकनूर येथील आरोपी शेख आसेम शेख मझर याच्याकडे आणत असत. तो अवघ्या दोन तासांत मोटारसायकलचे सर्व पार्ट वेगळे करून त्यांची विल्हेवाट लावत असल्याचे उघड झाले आहे. तसेच मोटारसायकलींचे चेसिस आणि इंजिन क्रमांक बदलल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात चोरीस गेलेल्या असल्याची शक्यता असून या जिल्ह्यांतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि. दीपक लंके, संतोष जंजाळ, पोउपनि. प्रदीप आढाव, मपोउपनि. निशिंगधा खुळे, ग्रेपोउपनि. सुरेश पारधी, श्रीमंत उबाळे तसेच पोलीस कर्मचारी रविंद्र राऊत, आशोक हंबर्डे, कल्याण राठोड, घोलप, राजू सांगळे, ऋषी पोटे व होमगार्ड महादेव पाटोळे यांनी सहभाग घेतला.

COMMENTS