अहमदनगर/प्रतिनिधी तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकली चोरी करुन वाहन चालकात दहशत पसरवणार्या सराईत चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलिसाना यश आले आह
अहमदनगर/प्रतिनिधी तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकली चोरी करुन वाहन चालकात दहशत पसरवणार्या सराईत चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलिसाना यश आले आहे. या टोळीकडून 23 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 24 मोटारसायकली हस्तगत करण्यात आले आहेत. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या कारवाईत मनोज गोरख मांजरे (वय 23, रा. शिवाजी नगर, कल्याण रोड ता. जि.अ.नगर), करण मनोज पवार ( वय 26 वर्षे, रा. कॉटेज कॉर्नर, ता.जि. अ.नगर), साहिल गफुर पठाण ( वय 20 वर्षे, मूळ रा. सारोला आडवाई, ता. पारनेर, जि. अ.नगर), योगेश सावळेराम मांजरे (वय 25 वर्षे, रा. भिस्तबाग, वैदवाडी, ता.जि. अ.नगर), उमेश दिलीप गायकवाड (वय 20 वर्षे, रा-नाना चौक, ढवणवस्ती, पाईपलाईन रोड, अ.नगर), शुभम अविनाश महाडुंळे (वय 23 वर्षे, रा. सारोळा आडवाई, ता पारनेर, जिल्हा अ.नगर) असे अटक केलेल्या सहा सराईत चोरट्यांची नावे आहेत.त्यांच्या कडून पोलिसांनी 6 बुलेट, 8 एच एफ डिलक्स, 3 स्प्लेंडर, 2 पॅशन प्रो, 2 पल्सर, 1 अक्सेस, 1 शाईन अशा विविध कंपनीच्या 24 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सुमारे एक ते दीड महिन्यांपासून तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत होते. त्यावरून मोटारसायकल चोरी करणारी टोळी हद्दीत वावरत असल्याचा संशय तोफखाना पोलिसांना आला. चोरटे पकडण्यासाठी सर्वच बाजूने तपास चालू होता. मोटासायकली चोरी करण्यात आलेल्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करुन पाहणी केल्यानंतर आरोपी चोरीच्या अभिलेखावरील असल्याची खात्री झाली. तसेच विश्वासू व गोपनिय बातमीदारांना पाळत ठेवण्यात सांगण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून दि. 08 मे 2023 रोजी मार्केट परिसरामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी सापळा रचला होता. त्यात एक संशयित इसम हालचाली करताना आढळला. त्यास हटकले असता तो पळू लागला. पाठलाग करुन गोरख मांजरे यास अटक करण्यात आली. तोफखाना पोलिस ठाण्यात आणून विश्वासात घेवून विचारपुस करण्यात आली. रॉयल इन्फील्ड कंपनीच्या बुलेट मोटारसायकली व इतर कंपनीच्याही मोटारसायकली साथीदारांसह चोरल्याची कबुली दिली. मनोज मांजरे याच्या मदतीने वरील साथीदारांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क 379, 34 प्रमाणे गुन्ह्यात अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपाधीक्षक अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखालील यांनी केली आहे.
चोरीच्या मोटरसायकली घेणार्यांवरही गुन्हे मोटरसायकल चोरीच्या गुन्हेच्या ज्या इसमांनी चोरीच्या मोटारसायकली विकत घेतलेल्या आहेत. त्यांचेवर कारवाई करून त्यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेले आहे. नागरीकांना आवाहन अत्यंत कमी किंमतीत व विना कागदपत्रे असलेली संशयित मोटारसायकल विक्री करताना आढळून आल्यास पोलीस ठाण्यास संपर्क करावा. अशा मोटारसायकल विकत घेवु नये, चोरीची मोटारसायकल विकत घेणार्या इसमावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद स्थानिक दुचाकी खरेदी विक्री करणारे व इतर दुकानदारांनी घ्यावी, असे आवाहन तोफखाना पोलिसांनी केले आहे.
COMMENTS