Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकरकमी एफआरपीसाठी कारखान्यावर मोटसायकल रॅली

इस्लामपूर / प्रतिनिधी : एकरकमी एफआरपी जाहीर करा, वजनातील काटामारी थांबवा, वजनकाते ऑनलाईन करा, तोडीचे पैसे बंद करा, आदीसह अन्य मागण्यासाठी शनिवा

औंधची पोलीस वसाहत फळा-फुलांनी बहरणार ; पोलीस वसाहतीत 100 झाडांची लागवड
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सातारा जिल्ह्यात दाखल : जिल्हाधिकारी
फलटण येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : एकरकमी एफआरपी जाहीर करा, वजनातील काटामारी थांबवा, वजनकाते ऑनलाईन करा, तोडीचे पैसे बंद करा, आदीसह अन्य मागण्यासाठी शनिवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा सहकारी साखर कारखाना वाळवा पासून रॅलीला प्रारंभ झाला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एक रकमी एफआरपी जाहीर करा अन्यथा खुर्च्या खाली करा. वजनाची काटेमारी बंद झाली पाहिजे अशा घोषणांनी कारखाना परिसर दणाणून सोडण्यात आला. या ठिकाणी साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
एकरकमी एफआरपी तातडीने जाहीर करावी. ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी वजन करून आणल्यानतंर ऊस गाळप केला जाईल, असे जाहीर करावे आदी मागण्या करण्यात आल्या. त्यांनी याबाबतीत सकारात्मक निर्णय घेतो असे सांगितले. राजारामबापू सहकारी साखर कारखाना साखराळे, विश्‍वास सहकारी साखर कारखाना चिखली. निनाई (दालमिया) शुगर कोकरुड येथे या रॅलीची सांगता झाली. रॅलीत भागवत जाधव, युवा आघाडीचे संजय बेले, जगन्नाथ भोसले, प्रवासी वाहतूक संघटनेचे तानाजी साठे, राजेंद्र माने प्रभाकर पाटील, राजाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पाटील, बाबुराव शिंदे, क्राँमेड दिग्यविजय पाटील, अ‍ॅड. दिपक लाड शिवलिंग शेटे, देवेंद्र धस, प्रकाश माळी, प्रदीप पाटील, मधुकर डिसले, मानसिंग पाटील, अरूण कवठेकर, अभय मंजुगडे, खासेराव निंबाळकर, सचिन पाटील, प्रकाश पाटील, विनायक पवार, संदीप शिरोटे, अशोक दिवे, प्रताप पाटील, अरविंद पाटील, सुरेश माहुतकर, अजित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हुतात्मा सहकारी साखर कारखानाचा ऊस उतारा कायम उच्चांकी असणारा परपंरा यावर्षी नीचांक्की आला. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याना एकरकमी एफआरपी राजारामबापू कारखानाच जिल्ह्यातील सर्व कारखान्याला खोडा घालत आहेत, अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापक आर. डी. माऊली यांच्या समोर व्यक्त केला.

COMMENTS