बीड प्रतिनिधी - जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुधवार रोजी एकलव्य भिल्ल समाज संघटना संस्थापिका सौ.सुमित्राताई पवार यांच्या आदेशान्वये व अॅड.सुर्यका

बीड प्रतिनिधी – जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुधवार रोजी एकलव्य भिल्ल समाज संघटना संस्थापिका सौ.सुमित्राताई पवार यांच्या आदेशान्वये व अॅड.सुर्यकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली लक्ष्मी चौक बायपास-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकात येवून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन तसेच पुढे घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जावून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन धर्मनिरपेक्षतेचा नारा देवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्ना संदर्भात चर्चा करतांना अॅड.सुर्यकांत पवार म्हणाले की, आदिवासी समाजाने देशपातळीवर कार्य केलेले असून नेहमीच देशहित पाहिले आहे. याचे उदाहरण द्यावयाचे झाले तर महाराणा प्रताप यांच्या बरोबर खांद्याला खांदा लढा देणारे महाराणा पुंजा भिल्ल यांनी गोरीला युद्धाच्या माध्यमातून 1 लाख मुघलांना जोरदार टक्कर दिली व स्वातंत्र्य लढयाच्या इतिहासात तंट्या मामा भिल्ल यांनी इंग्रजांनी देशातून लुट केलेला सोने-चांदी ऐवज, देशाच्या बाहेर जावू नये म्हणून रेल्वेची लुट केली व देशाचे सोने, चांदी, ऐवज देशातच ठेवण्याचे हित पाहिले असा लढाऊ आदिवासी समाज हा आज शिक्षणापासून आणि आधुनिक धावत्या जगापासून दूर वाटत आहे तरी समाज बांधवांना या प्रवाहात आणण्यासाठी पुन्हा एकवेळ सर्व मिळून प्रगतीसाठी लढा उभारु असे यावेळी निरोपाप्रसंगी अॅड.सुर्यकांत पवार म्हणाले. यावेळी पप्पु पवार तालुकाध्यक्ष, मुकुंद धुताडमल युवा नेतृत्व, प्रकाश धुताडमल, , जीवन पवार, कानिफनाथ माळी, राजु माळी, देविदास बरडे, योगेश पवार आदी शेकडो आदिवासी बांधवांची उपस्थिती होती.
COMMENTS