Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट !

मुंबई प्रतिनिधी - सध्या सर्वत्र फोटोशूटची प्रचंड क्रेझ सुरू आहे. वेडिंग फोटोशूट, प्री वेडिंग फोटोशूट, प्रेग्नेंसी तसेच मॅटर्निटी फोटोशूट अशा

शाळेच्या उन्हाळी सुट्या रद्द ; रविवारीही शाळा सुरु
राज्यातील सहकारी पतसंस्थांना दिलासा
राजकीय पक्ष मतदाना पुरताच जनतेचा वापर करतात – प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे

मुंबई प्रतिनिधी – सध्या सर्वत्र फोटोशूटची प्रचंड क्रेझ सुरू आहे. वेडिंग फोटोशूट, प्री वेडिंग फोटोशूट, प्रेग्नेंसी तसेच मॅटर्निटी फोटोशूट अशा अनेक प्रसंगी लोक फोटोशूट करत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच फोटोशूटचे वेड लागले आहे. मात्र सध्या एका अशा फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.. हे प्रेग्रेसी फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरण्याचा कारण म्हणजे घरातल्या लेकीसह तिची आई, सासू आणि आजीही प्रेग्नंट झाली आहे. प्रेग्नन्सीच्या या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेमकी काय आहे ही भानगडं, चला जाणून घेवू घरात चिमुकला पाहुणा येणार म्हणलं की सगळी फॅमिलीच खुश असते. प्रत्येकजण या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्सुक असतो. कुणी आई-बाबा होणार म्हणून, कुणी आजी-आजोबा होणार म्हणून, कुणी काका-काकी होणार म्हणून तर कुणी मामा-मामी होणार म्हणून या पाहुण्याच्या स्वागताची तयारी करत असतो. सध्या या व्हायरल होत असलेल्या या कुटूंबानेही असेच हटके फोटोशूट करायचं ठरवलं. त्यामुळे त्यांच्या फोटोशूटमध्ये सून सासू एवढंच नाही तर आई आणि आजीही गर्भवती आहे. 3 पिढ्यातील महिला एकाच वेळी गर्भवती झाल्याचे दिसत आहेत. सासू सून आई आणि आजीने एकत्र बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वास्तविक झालं अस की, प्रेग्नेंसीचे हे फोटो काढले आहेत ते जिबिन जॉयने. जो एक फोटोग्राफर आहे. जिबिनने हे मॅटरनिटी फोटोशूट केलं आहे. त्याची बायको चिंचू पीएसचं हे मॅटरनिटी फोटोशूट आहे. ज्यात जिबिनचं कुटुंब दिसतं आहे. त्याच्या बायकोसह त्याची आई, सासू आणि वयाची 80 ओलांडलेली आजीही प्रेग्नंट दिसते आहे. सर्व दाम्पत्याने अगदी आईबाबा होणार असलेल्या दाम्पत्यांप्रमाणेच पोझ दिल्या आहेत.

COMMENTS