Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मॉर्निंग वॉकचा हृदय विकारासाठी चांगला फायदा: डॉ . सुरेश पाटील

लाईफ केअर कार्डीयाक सेंटरचा उपक्रम

नाशिक: मॉर्निंग वॉक करणे शरीराबरोबरच हृदया साठी फायदेशीर ठरते. यामुळे वयानुसार झेपेल तितका व्यायाम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लाईफ केअर कार्ड

विषाणूंचे पुनर्प्रस्थापन आणि …
इस्लामपूर भाजपा युवा मोर्चाचे अभिजीत खडके यांचे अपघाती निधन
इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी

नाशिक: मॉर्निंग वॉक करणे शरीराबरोबरच हृदया साठी फायदेशीर ठरते. यामुळे वयानुसार झेपेल तितका व्यायाम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लाईफ केअर कार्डियाक सेंटरचे हृदय विकार तज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी केले. मॉर्निंग ग्रूप आयोजीत मॉर्निंग टिप्स उपक्रमात डॉ. पाटील बोलत होते.यावेळी डॉ. एम.बी.पवार,  तुकाराम येवले,  डॉ. पाटील म्हणाले की, हृदयविकाराची जोखीम कमी करण्याकरिता टाळता येणाऱ्या जोखमीच्या घटकांकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे.यामध्ये चुकीचा आहार,व्यायामाचा अभाव,अपुरी झोप, मद्यपान, धुम्रपान, तंबाखू सेवन, लठ्ठपणा यांचा समावेश आहे. उच्च रक्तदाब,कोलेस्ट्रॉलचा त्रास ज्यांना आहे,त्यांनी यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे.यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे,योग्य आहार व इतर काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

आधी हृदयविकार हा पन्नाशीच्या पुढील व्यक्तींमध्ये दिसून यायचा,मात्र आता तरुण पिढीला देखील या विकाराने विळखा घातलेला दिसत आहे. बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण नसणे,बैठी जीवनशैली,वाढता ताण-तणाव आणि मानसिक आरोग्य या सर्व गोष्टी यात भर घालत आहेत.बाहेरचे खाद्यपदार्थ किती खावेत याला मर्यादा असावी. मद्यपान आणि धुम्रपान या समाजासाठी चिंताजनक बनत चालल्या आहेत. महामारीच्या काळात आणि त्यानंतर वर्क फ्रॉम होमच्या काळात शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत आणि बैठी जीवनशैलीच्या दुष्परिणामांमध्ये यामुळे आणखी भर पडली आहे. त्यामुळे वर्षातून एक वेळा हृदयाची तपासणी गरजेचे असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

COMMENTS