Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या

मुंबई : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण

‘दार उघड बये’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सांगलीतील सामूहिक हत्यांकाड प्रकरणी मांत्रिकाला अटक
पालखेड धरण व डावा कालवा बिगर सिंचन आवर्तनाची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट देवून केली पाहणी

मुंबई : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.

     राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात मतदान केंद्रानिहाय पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.

     यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई विशेषरित्या बनवली जाते. या सर्व शाईच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांना पुढील वाटपासाठी ताब्यात देण्यात येत आहेत.      मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.  मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात.

COMMENTS