Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट संपादक म्हणून माजलगावचे परमेश्वर सोळंके मूकनायक पुरस्कार जाहीर

माजलगाव । प्रतिनिधीदरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पत्रकार संघ गेवराई यांचा वतीने मूकनायक पुरस्काराचे वितरण केले जाते त्याप्रमाणे यावर्षी उत्कृष्ट संपाद

हार्टअटॅकने निधन झालेल्या खातेदाराच्या गोल्ड लोनचा इन्शुरन्स मंजूर; वारसदारांना दागिने सुपूर्त
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचा माजलगाव पत्रकारांच्या वतीने सत्कार
Beed : माजलगाव धरण ओव्ह्यरफ्लो (Video)

माजलगाव । प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र पत्रकार संघ गेवराई यांचा वतीने मूकनायक पुरस्काराचे वितरण केले जाते त्याप्रमाणे यावर्षी उत्कृष्ट संपादक म्हणून माजलगाव तालुक्यातील बीड लोकरंजन चे  मुख्य संपादक  परमेश्वर सोळंके यांना यावर्षीचा मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बापूसाहेब हुंबरे तथा   माजलगाव तालुका अध्यक्ष संतोष रासवे व बालासाहेब उफाडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते त्याप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्‍या महत्वपूर्ण लोकांचा सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये माजलगाव तालुक्यातून बीड लोकरंजन चे मुख्य  संपादक परमेश्वर सोळंके यांची उत्कृष्ट संपादक म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाने निवड केली आहे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सदरील पुरस्काराचे वितरण गेवराई येथील शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे होणार आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिरीष कुलकर्णी साहेब पुणे हे असणार आहेत तर उद्घाटक म्हणून गेवराईचे डीवाय.एस.पी. अनिल कटके उपस्थित राहणार आहेत प्रमुख गेवराई मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित माजी मंत्री बदामराव पंडित, भाजपा नेते बाळराजे पवार उपस्थित राहणार आहेत तर पुरस्कार वितरक म्हणून गेवराई तालुक्याचे तहसीलदार श्री खोमणे साहेब, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप साहेब झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील असतील या सह अनेक प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा मूकनायक पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे तरी हितचिंतक कार्यकर्ते वाचक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब हुंबरे यांच्यासह माजलगाव तालुकाध्यक्ष  संतोष रासवे  व बालासाहेब उफाडे यांनी केले आहे

COMMENTS