मुंबई/प्रतिनिधी ः यंदा मान्सून उशीरा दाखल होण्याचा अंदाज काही हवामान संस्थांनी व्यक्त केला होता. मात्र मान्सून यंदा वेळेवर दाखल होणार असल्याची मा
मुंबई/प्रतिनिधी ः यंदा मान्सून उशीरा दाखल होण्याचा अंदाज काही हवामान संस्थांनी व्यक्त केला होता. मात्र मान्सून यंदा वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती स्कायमॅट या हवामान संस्थेनी वर्तवली आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पावसाची चातकासारखी वाट बघत असतांनाच, यंदा मान्सून वेळेवर दाखत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सून येईल, असे संकेत मिळालेत. कोकणात 27 मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. 5 ते 7 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. पुढील 3-4 दिवसात पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होऊन मे महिन्यात पहिले नऊ दिवस ढगाळ वातावरण व जेथे पोषक वातावरण तिथेच पाऊस पडला. यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होता. शिवाय मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत कोणतेही उष्णकटिबंधीय वादळ आले नाही. एप्रिलमध्ये भारताच्या समुद्रात एकही चक्रीवादळ दिसले नाही. एप्रिल महिन्यात उष्णकटिबंधीय वादळ न येण्याचे हे सलग चौथे वर्ष राहिले. त्यामुळे तापमान कमी राहण्याची नोंद झाली. वातावरण सातत्याने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तापमानाबरोबरच वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
COMMENTS