मुंबईत अखेर मान्सूनचं आगमन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत अखेर मान्सूनचं आगमन

मुंबई : अखेर आज मान्सूनचे राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून आज मुंबईसह कोकणातील

दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला
श्रीलंकेला प्रयान करण्यापूर्वी गौतमचा पत्रकारांशी गंभीर सामना
पाटण तालुक्यात काँगे्रस शून्यातून विश्‍व निर्माण करणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : अखेर आज मान्सूनचे राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून आज मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाली. पावसाळा सुरू होताच मुंबईतील अनेक भागात सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही मान्सूनने दणका दिला आहे. महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वार्‍याचा वेग आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला, अशी हवामान खात्याने दिली आहे. इतकंच नाहीतर शनिवारी दुपारनंतर मुंबईत पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 11 जून रोजी डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटक व काही भागांत मान्सूनचं आगमन झालं आहे.

COMMENTS