Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमपीएससीमध्ये मोनिका झरेकर राज्यात दुसरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नुकत्याच झालेल्या वैधमापन निरीक्षक शास्त्र ह्या राजपत्रित अधिकारीपदी मोनिका

पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकासह एक कर्मचारी निलंबित ; फुंदे खूनप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका
राज्य फेडरेशनची क्रॉस प्रणाली वापरल्याशिवाय कर्ज वितरण करू नये
निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार : डॉ. श्रीपाल सबनीस

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नुकत्याच झालेल्या वैधमापन निरीक्षक शास्त्र ह्या राजपत्रित अधिकारीपदी मोनिका बाळासाहेब झरेकर मुलीमधून राज्यात दुसरी आली आहे. मोनिका झरेकर ही खातगाव टाकळी (ता.नगर) येथील रहिवासी आहे. नौदलातील अधिकारी बाळासाहेब झरेकर यांची कन्या आहे. तिची यापूर्वी राज्य करनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय) या पदांसाठी सुद्धा निवड झाली होती. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बबनराव झरेकर यांची पुतणी, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सेवानिवृत्त) सुरेश शिंदे यांची भाची आहे. या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS