Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील सुरज मोहिते टोळीवर मोक्का

पुणे ः  हडपसर भागात राहणार्‍या एका तरुणाने पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याचे रागातून गुंड सुरज मोहिते व त्याच्या टोळीतील साथीदारांनी तरुणावर

काॅंग्रेस सोबतचे शीतयुद्ध…! 
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागावर पाणी टंचाईचे सावट
मराठी भाषेला ’अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा – खासदार हेमंत पाटील

पुणे ः  हडपसर भागात राहणार्‍या एका तरुणाने पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याचे रागातून गुंड सुरज मोहिते व त्याच्या टोळीतील साथीदारांनी तरुणावर कोयत्याने वार करुन तसेच दगड मारुन त्याला जखमी केले होते. तसेच यापूर्वी देखील हडपसर भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्याचे निर्देशनास आले अहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी गुंड सुरज मोहिते टोळीतील 15 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1), 3(2), 3(4) नुसार (मोक्का) कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांचे मागर्दर्शनाखाली आतापर्यंतची ही 109व्या टोळीवर मोक्का कारवाई आहे.
सुरज ऊर्फ चूस बाळु मोहिते (वय-22), अनिकेत रविंद पाटोळे (23), आदित्य रविंद्र पाटोळे (20), तुषार बाळु मोहिते (19), नवनाथ ऊर्फ लखन बाळु मोहिते (19), हासनेल अली शेनागो (19), गौरव विजय झाटे (19), ओमकार मारुती देढे (19), पंकज विठ्ठल कांबळे (20), रविंद्र बाबुराव पाटोळे (46), सचिन मारुती खंडाळे (25) यांच्यासह पाच अल्पवयीन मुलांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार त्यांचे राहत्या घरात असताना, सदर परिसरात राहाणारे आरोपी यांनी तोंडाला रुमाल बांधून हातात धारदार शस्त्र घेऊन घराबाहेर आले. त्यांनी यापूर्वी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन तक्रारदार यांना शिवीगाळ करुन आता याला जिवंत सोडत नाही असे म्हणत कोयत्याने वार करुन तसेच दगडाने मारुन जखमी केले. तसेच सदर भागातील दुकानातील काऊंटरच्या काचा, बाहेर पार्क केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची कोयत्याने तोडफोड करुन नुकसान करण्यात आले. तसेच हवेत शस्त्र फिरवून दहशत निर्माण करण्यात आली. टोळी प्रमुख सुरज मोहिते याने हिंसक मार्गाचा अवलंब करत स्वत:चे व टोळीचे वर्चस्व रहावे म्हणून गैरमार्गाने आर्थिक फायदा मिळविण्यासाठी व नागरिकांच्य मनात भिती निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे विरुध्द बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दुखापत करणे असे गुन्हे दाखल असून त्यांचे विरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील ते पुन्हा गुन्हे करत आहे. त्यामुळे वपोनि रविंद्र शेळके यांनी सदर टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त आर. राजा यांचे मार्फेत अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला पोलिस आयुक्तांनी मान्यता दिली. याबाबत पुढील तपास एसीपी अश्‍विनी राख करत आहे.

COMMENTS