पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात साथीदारांचे मदतीने वेगवेगळे गंभीर गुन्हे करणार्या ओंकार ऊर्फ टेडया उमेश सातपुते टोळीवर पुणे पोल
पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात साथीदारांचे मदतीने वेगवेगळे गंभीर गुन्हे करणार्या ओंकार ऊर्फ टेडया उमेश सातपुते टोळीवर पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंर्तगत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंर्तगत ही 42 वी कारवाई आहे.
ओंकार सातपुते (वय-23,रा.वारजे माळवाडी,पुणे), वीर फकीरा युवराज कांबळे (22,रा.शिवणे,पुणे) यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांना पोलिसांनी अटक केली आहे 16 जून रोजी रामनगर येथील जयभवानी चौकात तक्रारदार हे त्यांचे घराचे समोर रस्त्यावर मित्रांसह क्रिकेड खेळत होते. त्यावेळी त्यांचे ओळखीचे किरण गावडेे, अविष्कार पवार व सोहम सातव यांन तक्रारदारास जवळ बोलवून ‘आज तुला खल्लास करतो’ असे म्हणून त्यांचेकडील बंदुक रोखली. त्यावेळी तक्रारदाराने सदर बंदुक हाताने वळविल्याने त्यातील गोळया जमीनीवर खायर झाल्या. त्यानंतर अविष्कार पवारने सदर बंदुकीतून फायर केल्याने तेथील लोक सैरावैरा पळू लागले. याप्रकरणी वारजे पोलिसांना आरोपींना अटक केली. पोलिस तपासात ओंकार सातपुते हा प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या टोळीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा गुन्हा करण्यासाठी कट रचणे, बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे, सर्वसामान्य नागरिकांचे मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, पोलिस आदेशाचा भंग करणे आदी गुन्हे दाखल आहे. त्यामुळे सदर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1) , 3(2) नुसार कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा,एसीपी भीमराव टिळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी, पीएसआय विशाल मिंडे, पोलिस अंमलदार संभाजी दराडे, विजय खिलारे, नितीन कातुर्डे यांचे पथकाने केली आहे.
COMMENTS