Homeताज्या बातम्यासंपादकीय

संविधानावर मोदींची आक्रमक भूमिका !

 भारतीय संविधानाच्या पंचाहत्तरी निमित्त देशाच्या संसदेत  सलग चार दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेत १३ आणि १४ तर राज्यसभे

ई-लर्निंग लोककल्याणविरोधी ! 
सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आणि टायमिंग ! 
मंडल आयोगाने कर्नाटकात मराठा ओबीसी आणि एसटी ठरवला; महाराष्ट्रात का नाही ? 

 भारतीय संविधानाच्या पंचाहत्तरी निमित्त देशाच्या संसदेत  सलग चार दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये लोकसभेत १३ आणि १४ तर राज्यसभेत १५ आणि १६ डिसेंबर, अशा चार दिवसांमध्ये ही चर्चा होत आहे. काल संध्याकाळी, लोकसभेतील चर्चेचा शेवटचा दिवस असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत संविधानावर स्वातंत्र्योत्तर काळाच्या एकूणच राजकीय व्यवहाराला लक्ष करित उत्तर दिले. ते म्हटले की, संविधानाच्या निर्मितीची भावना राष्ट्रीय एकतेची होती. परंतु, सत्ता मिळाल्यानंतर या देशातल्या एकाच परिवाराने आपल्या मनमर्जीप्रमाणे सत्ता चालवली. संविधानाचा अर्थ आपल्या मनमर्जीप्रमाणे लावला. या देशातल्या एकतेला धोका निर्माण केला; असा स्पष्ट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावला. त्यापूर्वी विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी संविधानावर चर्चा करत असताना, गांधी परिवाराचा उल्लेख करत, तर, कधी अनुल्लेख करत, संविधानाची मोडतोड करणे आणि संविधानाच्या भावनांचा किंवा तत्वांचा खेळ करण्याची परिस्थिती, ही गांधी परिवाराने निर्माण केली; असा थेट आरोप केला. अर्थात, त्यापूर्वी लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदार म्हणून प्रियांका  गांधी-वाड्रा यांनी जे भाषण केले, ते भाषण अतिशय गाजले. त्या भाषणाचा उल्लेख अनेक समाज माध्यमांमध्ये सरकार विरोधातील एफ आय आरची पार्श्वभूमी, अशा प्रकारे केल्याचे म्हटले गेले; परंतु, या सगळ्या गोष्टींना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले, ते उत्तर पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाचा खरपूस मात्र घेतला. हा समाचार घेत असताना त्यांनी संविधान आणि काँग्रेसतेर विरोधी पक्षांना फारसं आपल्या भाषणाचा विषय ठेवला नाही. यावरूनच, काँग्रेसला देखील त्यांनी आपल्या भाषणात आणले नाही. केवळ, एक परिवार गांधी-नेहरू परिवाराला लक्ष्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये आपले संविधानावरील भाषण पुढे नेलं. याचा अर्थ, देशात गांधी परिवाराशिवाय या पुढची राजकीय वाटचाल करायची का, अशा प्रकारचा एक सुप्त संदेश त्यांच्या भाषणातून पुढे येतो. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या अडाणी विरोधी आंदोलनातून इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी घुमजाव केले. हे घुमजाव म्हणजे मोदींना अपेक्षित असलेल्या गांधी परिवाराची सोबत न करण्याचा भाग आहे का? असेही त्यांच्या आजच्या आक्रमक भाषणाचा अर्थ पाहता येऊ शकेल!  प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केलेल्या भाषणामध्ये मोदी यांनी संविधान आपल्या माथ्याला लावलं. परंतु, त्याची मोडतोड होत असताना त्यांच्या कपाळावर साध्या आठ्या देखील उमटल्या नाहीत. असं वाटतं  की, मणिपूर सह अन्य ठिकाणी हिंसक घटना देशामध्ये घडल्या. त्या संविधानाच्या जणू सन्मान करणाराच आहेत; असं मोदींना वाटतं का? अशा शब्दात प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आरोप केले होते. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या भाषणाचा देशभरात गौरव झाला. परंतु, काल संध्याकाळी मोदी यांनी संविधानाच्या चर्चेवर उत्तर देताना, ज्या पद्धतीने आक्रमक होऊन आपली भूमिका मांडली; ती भूमिका पाहता मोदी हे कुठल्याही भूमिकेने नरमले नाहीत! या उलट, संविधानाचे पालन आमच्या काळात कसे होत आहे, याचा एक प्रकारे त्यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे संविधानाच्या संदर्भात संसदेमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मोदी शेवटचा डाव खेळून गेले की, जो विरोधकांनाही नामोहरण करून गेला!

COMMENTS