मोदी ‘खालचा’ अंधार

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मोदी ‘खालचा’ अंधार

 करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले.

आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा
बंडखोरीची टांगती तलवार !
शिकारीच बनले सावज!

 करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे अनंत हाल-अपेष्टा सहन करत या मजुरांना आपापल्या गावी परत जावे लागले. देशात करोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेल काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने तसे उत्तर दिले. पण प्रश्न हा आहे की, जेव्हा हे दोन्ही पक्ष मजुरांना त्यांच्या गावी पाठवत होते तेव्हा भाजप सरकार काय करत होते? मोदींनी तेव्हा भूमिका का घेतली नाही? याउलट मोदींनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जे केले हास्यपद आणि केविलवाणे केले हे सत्य. भारतातल्या बुद्धिजीवी वर्गाला तेव्हाही ते पटले नव्हते. पण आपल्या १३० कोटी देशवासीयांमध्ये बुद्धिजीवी लोक किती? हा तसा गंभीर प्रश्न. या १३० कोटी तज्ज्ञांनी अतितज्ज्ञ नरेंद्र मोदींचे ऐकले होते हेही खरे. त्याला काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेतेही अपवाद नाहीत.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी एक तासाहून अधिक केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका आणि आरोपांचा भडिमार केला. ‘‘करोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. हा मोदींचा आरोप खरंच. पण कोरोना काळात लोकांचा रोजगार गेल्यानंतर मोदी सरकारने त्याला काही सक्षम पर्याय दिला नाही हेही सत्य. जेव्हा एखाद्या देशात असे संकट येत असते तेव्हा त्या देशातील जनतेला जगवणे हे त्या देशाच्या सरकारचे काम असते. तसे काम मोदींनी केले नाही. लोकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी सरकारने जे पाऊल उचलायला हवे होते तसे सरकारने उचलले नाही. त्यामुळे लोक ट्रेनखाली मेले. याविरुद्ध परदेशातील श्रीमंत, मध्यम वर्गीय लोकांना विमानाने देशात आणण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. यावरून गरीब मजूर जनतेबद्दलचा मोदीचा बेगडी प्रेमाचा भांडाफोड होतो.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनावर औषध निघाले नसल्यामुळे संपूर्ण जग चिंतेच्या छायेखाली होते. जगातले सर्व लोक घाबरलेले होते. यात अनेक लोकांचा बळी गेला. जगातले सर्व शास्त्रज्ञ कोरोनावर औषध शोधत होते. जगातील सर्व सत्ताधीश शास्त्रज्ञांना सर्वोपरी मदत करत जनतेला धीर देत होते. नियमाचे पालन करण्याचे आवाहन करत होते. भारतात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा असे उपदेश देत होते. मोदींच्या या आव्हानांवर संपूर्ण जगातले शास्त्रज्ञ आणि बुद्धिजीवी लोक हसत होते. हे म्हणजे झाले असे की, ‘दुखणे म्हशीला आणि इंजेक्शन पाखालीला’. तरीही आपल्या भारतात मोदींनी केलेल्या आव्हानाला साथ देत जवळपास १३० कोटी जनतेने टाळ्या- थाळ्या वाजवल्या. आणि दिवेही लावले. पण विज्ञान आधारावर मोदींच्या त्या आव्हानाखालचा अंधार आपल्या लोकांना दिसला नाही. मोदींनी केलेले उपदेश भंपक / खोटे होते, हे सिद्ध झाल्यावरही त्यावर कुणी चर्चा केली नाही. हे प्रचंड भयंकर आहे. यावर भारतातील माध्यम व्यवस्थेनेही मोदींच्या सुरत सूर मिळवून जनतेला तसे करायला लावले होते. लोकांनी भीतीपोटी दिवा लावला खरा पण मोदी ‘खालचा’ अंधार  लोकांना दिसलाच नाही.

COMMENTS