Homeताज्या बातम्यादेश

मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही

काँगे्रस नेते राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिकांचा दावा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते सत्यपाल मलिक यांनी काँगे्रस नेते राहुल गांधींना दिलेल्या एका मुलाखतीत अनेक वादग्रस्त मुद

विनयभंग करणार्‍यास तीन महिने कारावास
राजीनामासत्र आणि सरकारचा दबाव
नेप्ती परिसरात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे होणार -गाडे

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते सत्यपाल मलिक यांनी काँगे्रस नेते राहुल गांधींना दिलेल्या एका मुलाखतीत अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करत, 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असा दावा केला आहे. सत्यपाल मलिकांनी जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी, जातीय जनगणना, मणिपूर हिंसा यासह अनेक मुद्द्यांवर विस्तृत भाष्य करत, भाजपवर कठोर टीका केली आहे.  

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधला. या 28 मिनिटांच्या संवादात राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्यासोबत पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलन, जातनिहाय जनगणना, मणिपूर हिंसाचार आदिसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी सत्यपाल मलिक म्हणाले की, निवडणुकीला केवळ 6 महिने राहिले आहेत. मी लिहून देतो की, मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही. सत्यपाल मलिक यांनी म्हटले की, माझे मत आहे की, तेथील (जम्मू काश्मीर) लोकांना जबरदस्तीने किंवा सुरक्षा दलांकरवी शांत ठेवले जाऊ शकत नाही. तेथील लोकांची मने जिंकून तुम्ही काहीही करू शकता. मी त्या लोकांना विश्‍वासात घेतले होते. मलिक यांनी म्हटले की, मला वाटते की, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा त्यांना परत करायला पाहिजे. केंद्र सरकारने आर्टिकल 370 कलम रद्द करून जम्मू काश्मीरला केंद्र शासित राज्य बनवले. त्यांना भीती वाटत होती की, राज्यातील पोलीस विद्रोह करतील. मात्र जम्मू काश्मीर पोलिसांनी नेहमी केंद्र सरकारला साथ दिली आहे. अमित शाह यांनी आश्‍वसन दिले हे की, ते राज्याचा दर्जा परत करतील. त्यामुळेत्यांनी लवकरात लवकर राज्याचा दर्जा परत करून निवडणूक लावावी. सत्यपाल मलिक म्हणाले की, हे लोक राज्याचा दर्जा परत का करत नाहीत, समजण्यापलिकडे आहे. याबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावर ते म्हणाले की, म्हटले तर आहे करायची काय गरज आहे. सर्वकाही ठीक तर चालले आहे. मात्र येथे काहीच ठीक चालले नाही. दहशतवादी घटना वाढल्या आहेत. राजौरीमध्ये दररोज काही ना काही होत असते. एक चांगली गोष्ट आहे की, लोकांनी आता टीव्ही पाहणे बंद केले आहे. आमच्याकडे आता सोशल मीडियाचे माध्यम आहे. मात्र हे लोक त्यावरही लगाम लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर राहुल गांधी म्हणाले की, माझे यूट्यूब अकाउंटही नियंत्रित केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  

COMMENTS