Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदी सरकार मुस्लिमविरोधी नाही : आठवले

मुंबई ः रिपब्लीकन पक्ष देशभर भाजप एनडीएला मजबूतीने साथ देत आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत आणि संपूर्ण देशात मोदी सरकार बद्दल चांगले वातावरण आहे. जन

मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक
प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्याचे विविध स्पर्धा परीक्षेत यश 
पुणे काँगे्रसमध्ये पुन्हा गटबाजी चव्हाट्यावर

मुंबई ः रिपब्लीकन पक्ष देशभर भाजप एनडीएला मजबूतीने साथ देत आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत आणि संपूर्ण देशात मोदी सरकार बद्दल चांगले वातावरण आहे. जनतेची चांगली साथ मोदींना मिळत आहे. त्यामुळे येत्या 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार असून त्यात मोदींच्या चारशे पारच्या नार्‍यावर विजयाचा शिक्कामोर्तब होणार आहे. मोदी सरकार मुस्लिमविरोधी नसल्याचा पुनरूच्चार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

COMMENTS