Homeताज्या बातम्यासंपादकीय

दिल्लीत मोदी करिश्मा !

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, जे चित्र समोर आले आहे, त्यामध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले असून; बहुमतापेक्षा किमान १२ जागा अधिक

कल्याण हल्ला प्रकरणावर फडणवीस आक्रमक !
अंबड ओबींसीं महासभा निमित्ताने…….
दु:खाचा “मोहोळ” उठू नये ! 

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, जे चित्र समोर आले आहे, त्यामध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले असून; बहुमतापेक्षा किमान १२ जागा अधिक भाजपाला मिळाल्या आहेत. दिल्लीमध्ये सलग अकरा वर्ष सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला मात्र केवळ २२ जागा मिळाल्या असून त्यांचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अर्थात, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाच्या अनुषंगाने देशभरात एक प्रकारे आनंदच व्यक्त केला गेला आहे; कारण, त्यांच्या राजकारणामध्ये एक नाटकीयता लपलेली असल्याचे, देशभरात मानले जाते. त्यामुळे, ती नाटकियता राजकारणातून बाद होऊ पाहते आहे, असं इतरांना वाटत आहे. दुसऱ्या बाजूला भाजपाने एकूण ४८ जागांवर विजय मिळवला. परंतु, आम आदमी पक्षाकडे जर आपण २२ जागा पाहिल्या तर त्यातील सात जागा या शेड्युल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या त्यांना मिळाल्या आहेत; तर, काही मुस्लिम जागेवर त्यांना विजय मिळाला आहे. मुस्लिम आणि दलित यांच्या वोट बँकेने आम आदमी पक्षाला २२ पर्यंत नेल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आता खरी लढाई ही दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल, यावर आहे. कारण, दिल्ली हे शहर असे आहे की येथील सर्व खासदार हे वरच्या जातीचे असले तरी, दिल्ली मध्ये सर्व जातींचं समप्रमाण असल्यामुळे तिथे सामाजिक समतोल साधन खूप गरजेचं आहे. अलीकडच्या राजकारणामध्ये मोदींचं ते वैशिष्ट मानलं जातं. कारण, जातींचं समीकरण त्यांनी समजून घेतल्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी या तीन प्रवर्गातून सत्तेवर ते अगदी नवखी माणसे घेतात आणि ज्यांना कधीही सत्तेवर आपण येऊ किंवा अगदी सत्तेच्या केंद्रात मुख्यमंत्री होऊ, अशी ज्यांना कधी स्वप्नही पडली नाहीत; अशा लोकांना ते सत्तेवर आणतात. त्यामुळे, सत्तास्थानी असलेली व्यक्ती मोदींकडे कायमची नतमस्तक होते आणि मग मोदींना हवे तसे कार्य त्या ठिकाणी करता येते. दिल्लीच्या निवडणुका या मोदींसाठी ही प्रतिष्ठेच्या होत्या. त्याचं एक कारण असं की, मोदींचा प्रभाव यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून गेला असला तरी, तो त्यांचा प्रभाव असल्यापेक्षा निवडणूक आयोगावरच अधिक आरोप झाले. त्यामुळे, दिल्लीचे राज्य केवळ मोदींच्या प्रभावाने वाचवता येईल का, त्या ठिकाणी सत्ता मिळेल का? यासाठी त्यांनी समीकरण बनवली. दिल्लीच्या निवडणुका सुरू असताना इंडिया आघाडीतील जवळपास सगळेच घटक दल हे आम आदमी पक्षाच्या बाजूने गेले. परंतु, इंडिया आघाडीतला मोठा घटक पक्ष काँग्रेस हा मात्र भाजपा आणि आम आदमी पक्ष यांच्यासमोर थेट लढला. अर्थात, याचा काँग्रेसला म्हणावा तसा फायदा झाला नाही परंतु गेल्या वेळेपेक्षा त्यांच्या मतांच्या टक्केवारीत साधारणता अडीच टक्क्यांचा फरक पडलेला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जर आपण म्हटलं तर काँग्रेसला या निवडणुकीचा लाभ झाला आहे. दुसऱ्या बाजूला, भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी याच तुलनात्मक जर आपण आकडेवारी पाहिली तरी, या दोघांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत फार तर अडीच टक्के एवढाच फरक आहे. परंतु, दोघांना मिळालेल्या जागांमध्ये जवळपास २६ जागांचं अंतर आहे. भाजपाला दिल्लीमध्ये एकंदरीत ४६ आणि वर अशी मते मिळाली; तर, आम आदमी पक्षाला ४३ टक्के पेक्षा अधिक मते मिळाली. एकंदरीत काँग्रेसला देखील साडेसहा टक्के मतं मिळाली. परंतु, या व्यतिरिक्त बसपा, आजाद समाज पार्टी, जनता दल युनायटेड, राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाला भोपळा फोडता आलेला नाही. एवढेच नव्हे तर, कोणत्याही पक्षाला चार डिजिट मधील आकडेवारी मतदारसंघ निहाय पार करता आलेली नाही. अपवाद स्वरूप बसपा आणि आझाद समाज पार्टी यांना दोन-तीन मतदारसंघात हजार पेक्षा अधिक मतदान आहे, एवढीच ती जमेची बाजू.

COMMENTS